‘धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून मारहाण’, गैरवर्तन…, करूणा शर्माचे खळबळजनक आरोप
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यलयात मुंडेंच्या गुडांनी मला मारहाण केली, माझ्यासोबत गैरवर्तने केल्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला. तू बीडमध्ये दिसलीस तर गोळी मारेन. मला बीड सोडण्याची धमकी दिली जात आहे.
ADVERTISEMENT
Karuna Sharma Big Alligation Against Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समोरच त्यांच्या गुडांनी मला मारहाण केली आहे. माझ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. बीड (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्याचा खुलासा करूणा शर्मा यांनी केला आहे. याबाबतची तक्रार गृहमंत्री देवेद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणात आता करूणा शर्मा यांनी न्यायाची अपेक्षा केली आहे.(karuna sharma big alligation against dhananjay munde devendra fadnavis beed news)
ADVERTISEMENT
करूणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंमुंडे यांच्यासह त्यांच्या गुंडावर गंभीर आरोप केले आहेत.मी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यलयात गेले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यलयात मुंडेंच्या गुडांनी मला मारहाण केली, माझ्यासोबत गैरवर्तने केल्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला. तू बीडमध्ये दिसलीस तर गोळी मारेन. मला बीड सोडण्याची धमकी दिली जात आहे. पण मी जिल्हा सोडणार नाही, असे करूणा शर्मा यांनी सांगितले. आता जर मला माझ्या आई-वडिलांना आणि कार्यकर्त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला, तर त्याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्यांची गुंडा गॅग जबाबदार असेल,असे देखील करूणा शर्मा यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Shiv Sena UBT: गरीबांची खिचडी खाल्ली तरी कोणी?, सूरज चव्हाणला कोर्टात हजर केलं पण…
या प्रकरणी मी गृहमंत्री देवेद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जर मला न्याय मिळाला नाही, तर मी दिल्लीत पंतप्रधानांसमोर जाऊन आंदोलन करेन, असे देखील करूणा शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच आता माझी फक्त इतकीच मागणी आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मला मिळावे.
हे वाचलं का?
मी चार वेळा महिला आयोगात तक्रार दिली पण काहीही झालेलं नाही. माझासारख्या इतरही अनेक महिलांवर अन्याय झाले आहेत त्यांनाही न्याय मिळालेला नाही. रुपाली चाकणकर जबाबदार पदावर आहेत त्यांनी यात लक्ष घालायला हवं,” अशी मागणीही करुणा शर्मा यांनी केली आहे.
हे ही वाचा : Rajan Salvi “मला अटक करा, जेलमध्ये टाका, पण बायको…”, ठाकरेंच्या आमदाराचा दाटला कंठ
माझा जिवाला धोका असूनही मी सुरक्षा मागूनही मला न्याय दिला जात नाही, असा आरोपही यावेळी करुणा शर्मा यांनी केला.माझा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे की, भाजपचा नारा आहे ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ मग मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करुणा शर्मा यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT