Buldhana : खामगावात गजानन महाराज प्रगटले? तोतया की बहुरूपी…भक्तांची दर्शनासाठी गर्दी
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात गजानन महाराज प्रगटल्याची माहिती समोर आली आहे. सुटाळपुरा परीसरात अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरात कथित गजानन महाराज प्रकटले आहेत.
ADVERTISEMENT
Gajanan Maharaj video viral : जका खान, बुलढाणा : जिल्ह्यातील खामगावात गजानन महाराज प्रगटल्याची माहिती समोर आली आहे. सुटाळपुरा परीसरात अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरात कथित गजानन महाराज प्रकटले आहेत. अशी बातमी संपूर्ण खामगावाच पसरताच सातव यांच्या घराभोवती रात्रीच भक्तांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आता या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. (khamgaon gajanan maharaj video went viral buldhana news)
ADVERTISEMENT
रविवारी 1 ऑक्टोंबरला रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास एक व्यक्ती सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव यांच्या घरासमोर गजानन महाराजांची वेशभूषा करून अचानक आला आणि ‘मला तुमच्या घरी जेवण करायचं’, असे त्यांनी सातव कुटुंबियांना म्हटले.
त्यानंतर सातव कुटुंबियांनी त्या व्यक्तीची जेवणाची व्यवस्था केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्या व्यक्तीला सातव यांच्या घरी जेवताना पाहिले. सातव यांच्या घरात गजानन महाराज प्रगटल्यांचे त्यांना वाटले. आणि बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण खामगावात पसरली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ajay jadeja : वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानची मोठी खेळी, टीम इंडियाला ठरणार आव्हान
आता सातव यांच्या घराच्या ठिकाणी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. संत गजानन महाराजांचा जयघोष करत शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होती. पण ही व्यक्ती कोण आहे..? कुठून आली..? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही. त्यानंतर थोड्याच वेळात ही व्यक्ती कुठे तरी निघून गेली आणि कुणाला माहिती देखील पडले नाही. मात्र रविवारी दुपारी सुद्धा खामगावच्या काही भागात याच गजानन महाराज सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे दर्शनासाठी गर्दी केली होती, तर काही दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यात ही अशीच चर्चा सुरू होती.
दरम्यान खरंच खामगावच्या सुटाळपुरा येथे श्री गजानन महाराज प्रगटले का ? की ती व्यक्ती कुणी बहुरूपी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Virar Story: सकाळी बकरी चारायला गेला, परतला तेव्हा करोडपती होऊनच आला!
ADVERTISEMENT