Mazi Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो... 'ही' एक गोष्ट केली नसेल तर 4500 रूपये विसरा!
Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळेच महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार
तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार
'ही' एक गोष्ट केली नसेल तर खात्यात जमा होणार नाही 4500 रूपये
Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळेच महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. परंतु, तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांनी तातडीनं करायची आहेत. नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे त्या गमावू शकतात. यासाठी नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... (Ladki Bahin Yojana latest Update you need to link your bank account to aadhar card to get ladki bahin yojana 4500 rupees)
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते ऑगस्ट महिन्यात आलेत. परंतु, कित्येक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने ऑगस्ट महिन्यात या योजनेचा त्यांना लाभ घेता आला नाही. पण ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आता आधार कार्ड लिंक झाले आहे. अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे 4500 रुपये लवकरच जमा होणार आहेत.
हेही वाचा : Abhishek vs Aishwarya: अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार? खळबळजनक Video आला समोर
या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे, तो अर्ज मंजूर झाला असेल. पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता, त्यावेळी आधारकार्डशी संबंधीत अससेली माहिती भरावी लागते. तसेच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसेच आधारकार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं.
त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधारकार्डशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचे बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँक तुमचे अकाऊंट आधारशी लिंक करून देते. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Pune News: पुण्यात कामाच्या ताणामुळे CA तरुणीचा मृत्यू! संतापलेल्या आईचं पत्र व्हायरल
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात केली आहे. यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र पैसे सरकारनं महिलांच्या खात्यात जमा केले. या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. राज्यभर या योजनेची सर्वत्र चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT