रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'त्या' एक्स्प्रेसमध्ये लावलं ATM, प्रवासात काढता येणार पैसाच पैसा
ATM In Train : भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. लोकांना आता रेल्वे प्रवासादरम्यान एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM सुविधा

खासगी बँकेने पंचवटी एक्स्प्रेसमध्ये लावलं ATM

ट्रायल तत्वावर ट्र्रेनमध्ये बसवलं एटीएम
ATM In Train : भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. लोकांना आता रेल्वे प्रवासादरम्यान एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी ही जबरदस्त सुविधा मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सुरु केली आहे. यासाठी एक्स्प्रेसमध्ये ऑनबोर्ड एटीएम लावण्याचा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. ही देशातील पहिली ट्रेन आहे, ज्यामध्ये प्रवाशांना चालत्या-फिरत्या प्रवासादरम्यान एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे.
खासगी बँकेने लावलं ATM
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमध्ये हा एटीएम एका खासगी बँकेकडून लावण्यात आला आहे. तसच हे एटीएम एसी चेअर कार कोचच्या मागच्या बाजूला असलेल्या विशेष क्युबिकलमध्ये इन्स्टॉल केलं आहे. यापूर्वी तिथे एक रेल्वेची पँट्री ठेवली जायची. प्रवाशांची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून क्यूबिकलमध्ये शटर डोर लावण्यात आलं आहे. जेणेकरून धावत्या ट्रेनमध्येही एटीएम सुरक्षित राहील.
हे ही वाचा >> ग्राहकांची मज्जाच मज्जा! आज सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी घसरण, तुमच्या शहरात आजचे दर काय?
ट्रायल तत्वावर सुरु केलं काम
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी म्हटलंय की, एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. प्रवाशांसाठी ही सुविधा औपचारिक पद्धतीने लवकरच सुरु करण्यात येईल. डब्ब्यात एटीएम इन्स्टॉल करण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक बदल मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये करण्यात आले आहेत.
पंचवटी एक्स्प्रेस दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि मनमाड जंक्शन, नाशिकमध्ये धावते. दोन्ही स्थानकांच्या स्टेशनमध्ये जवळपास 4 तास 35 मिनिटांचं अंतर आहे. या ट्रेनमध्ये जबरदस्त सुविधा असल्याने तसच हाय डिमांडमुळे या रेल्वे रूटवर खूप लोकप्रिय मानली जाते.