Lawrence Bishnoi Gang: धमकी, सुपारी आणि दहशत... बिश्नोईच्या नेटवर्कची Inside स्टोरी
Lawrence Bishnoi Gang : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला.राजकीय विश्वासह बॉलिवूडमध्येही या घटनेनं खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गोल्डी ब्रार नेमका कोण?
लॉरेन्स आणि गोल्डीची मैत्री कशी झाली?
कोण आहे सचिन आणि अनमोल बिश्नोई?
Lawrence Bishnoi Gang : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला.राजकीय विश्वासह बॉलिवूडमध्येही या घटनेनं खळबळ उडाली. मात्र, ही कहाणी फक्त एका हत्येपर्यंत मर्यादित राहिली नसून, या घटनेतून धमकी, सुपारी, दहशत ते वसुलीचं एक मोठं नेक्सस समोर आलंय. फक्त जेलमध्ये बसलेला लॉरेन्स ते बाबा सिद्दीकींना मारणारे शूटर्स एवढंच हे नेटवर्क मर्यादित नसून, सीमेपलीकडच्या साथीदारांबद्दलही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. थरकाप उडवणाऱ्या कृत्यांमागे असलेली ही टोळी उभी तरी कशी राहिली हा प्रश्न आता अनेकांना पडतोय. पंजाब, हरियाणा, मुंबईसह देशातले 12 राज्य आणि कॅनडापर्यंत पोहोचलेल्या या नेटवर्कची ही इनसाई़ड स्टोरी.
ADVERTISEMENT
लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचं नाव यापूर्वी सिद्धू मुसेवाला प्रकरणात समोर आलं होतं. पंजाबसह देशभरात आणि जगभरातील संगीतप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेल्या सिद्धूच्या हत्येनं मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणातही सिद्धूचं नाव समोर आलं. आणि त्यानंतर आता बाबा सिद्दीकींची हत्या. गुन्हेगारी जगतात वेगाने वाढत असलेल्या या नेटवर्कचा म्होरक्या आणि लॉरेन्स बिश्नोई, मात्र या गैरकृत्यांमध्ये तेवढंच नाव आलं ते गोल्डी ब्रारचं. कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रारवर अनेक मोठ्या गुन्ह्यांचे आरोप झाले आहेत. कधीकाळी धमक्या आणि सुपाऱ्या घेणाऱ्या या टोळीचं नेटवर्क आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलंय. यामध्ये लॉरेन्स आणि गोल्डी ब्रारसोबत येणारं तिसरं नाव म्हणजे सचिन बिश्नोई.
हेही वाचा : Gold Price: ऐन सणासुदीत सोन्याने गाठला उच्चांक! 1 तोळ्याचा भाव बघूनच होईल नादखुळा
गोल्डी ब्रार नेमका कोण?
केंद्रीय गृहमंत्रालयाने सतविंदरसिंग उर्फ गोल्डी ब्रारला अतिरेकी घोषित केलंय. त्याच्याविरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये तब्बल 54 गुन्हे दाखल असून, यापैकी 24 प्रकरणं हे वसुलीशी संबंधीत आहेत.चंदीगड जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यादरम्यान NIA ने ही माहिती दिली होती. गोल्डी ब्रार हा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असून तो एका मोठ्या नेटवर्कचा म्होरक्या असल्याचंही यावेळी म्हटलं होतं.
हे वाचलं का?
गोल्डी ब्रारवर आतापर्यंत अनेक बड्या व्यापाऱ्यांना धमकावल्याचे, खंडणी वसुल केल्याचे आरोप आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या 54 प्रकरणांपैकी 40 पंजाब आणि 14 हरियाणातले आहेत. गोल्डी ब्रारचे कुटुंबीय पोलीस खात्यात नोकरी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सुरूवातीला लहानमोठ्या प्रकरणांमध्ये नाव समोर येणाऱ्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात थेट फेसबूक पोस्टटाकून प्रकरणाची जबाबदारी घेतली होती. तसंच थेट लाईव्ह टीव्हीवरही या प्रकरणाची जबाबदारी घेतली. लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी विक्की मिदुखेराच्या हत्येमध्ये सिद्धू मुसेवालाही सहभागी असल्याचा आरोप करत गोल्डी ब्रारने सिद्धूला मारल्याचं कबूल केलं होतं.
प्रसिद्धी रॅपर हनीसिंगलाही गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेल आला होता.त्यानंतर हनीसिंगने थेट दिल्ली पोलीस मुख्यालय गाठत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, मे 2024 मध्ये गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचंही समोर आलं होतं. मात्र त्यानंतर अमेरिकीतील पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या मृत्यूची बातमी फेटाळली होती.
ADVERTISEMENT
लॉरेन्स आणि गोल्डीची मैत्री कशी झाली?
लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारची पहिली भेट चंदीगडमधील त्यांच्या कॉलेजमध्ये झाली. राजस्थानच्या एका बड्या राजकारण्याशी संबंधीत कुटुंबातून असलेल्या लॉरेन्सने कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच गुन्हेगारीजगतात पाय ठेवला होता. धमक्या, वसुलीचे अनेक प्रकरणं होत गेले आणि लॉरेन्सचं नाव हळूहळू उत्तर भारतातल्या बड्या गुन्हेगारांच्या यादीत येऊ लागलं.
ADVERTISEMENT
दुसरीकडे पंजाबच्या फरीदकोटचा असलेल्या गोल्डी ब्रारही आपल्या वडिलांमुळे एका राजकीय पक्षातील नेत्याच्या संपर्कात आला. चंदीगडमध्ये शिक्षणासाठी आलेल्या गोल्डी ब्रारची लॉरेन्ससोबत ओळख झाली. दोघांनाही गुन्हेगारीत इंटरेस्ट असल्यानं त्यांची मैत्री झाली. त्यानंतर लॉरेन्स आणि गोल्डीने मिळून अनेक गैरकृत्य केले. पुढे गोल्डी ब्रार हा पंजाबमध्ये काम सांभाळू लागला.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांना तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट! मुंबईत IMD चा अंदाज काय?
कोण आहे सचिन आणि अनमोल बिश्नोई?
गोल्डी आणि लॉरेन्सच्या गुन्ह्यांचा व्याप पुढे वाढतच गेला. त्यानंतर 2017 ला गोल्डी ब्रार देश सोडून कॅनडाला पळाला. त्यानंतर कॅनडातला गोल्डी आणि जेलमध्ये असलेला लॉरेन्स हे कायम संपर्कात होते. 2022 मध्ये गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर हे आंतरराष्ट्रीय नेटवर्क पुन्हा समोर आलं. या सर्व प्रकरणांमध्ये पुढे लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि सचिन बिश्नोई यांचीही नावं समोर आली. या दोघांवरही आता गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे यातील सचिन बिश्नोईने आपण स्वत: सिद्धू मुसेवालाला गोळी मारल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. तर लॉरेन्स, सचिन आणि अनमोल हे तिघंही एकाच गावातले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, धमकी, खंडनी, हत्या, दहशत आणि तस्करीचं हे रॅकेट मोडून टाकण्याचं मोठं आव्हान सध्या देशातील अनेक राज्यातले पोलीस आणि केंद्रीय तपासयंणांसमोर उभं राहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT