पंढरीच्या वारीत घडला चमत्कार! दिंडीत चुकला पण... 250 किमी प्रवास करत घरी पोहचला श्वान!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एका भाविकाची त्याच्या श्वानासोबत दिंडीत चुकामुक झाली.

point

पण हा श्वान 250 किमी प्रवास करून आता पुन्हा घरी परतला.

point

पंढरपूर येथून परत येताना लाखोंच्या गर्दीत हा श्वान हरवला होता.

Kolhapur News : पाऊले चालती पंढरीची वाट... आषाढी एकादशी म्हणजे लाखो भाविकांसाठी स्वर्गसुखच! यंदाची आषाढी एकदशी नुकतीच 17 जुलै 2024 ला झाली. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अवघी पंढरी दुमदुमली होती. अशातच विठुरायाचा चमत्कार म्हणावा अशी एक घटना महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील निपाणीजवळ असलेल्या यमगर्णी गावात घडली आहे. या गावातील एका भाविकाची त्याच्या श्वानासोबत दिंडीत चुकामुक झाली होती. पण हा श्वान 250 किमी प्रवास करून आता पुन्हा घरी परतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वारीच्या गर्दीत हरवलेली माणसंच सापडत नाहीत, तर प्राणीही सापडतात हे या घटनेतून आता सिद्ध झाले आहे. (lost dog in pandharpur wari on ashadhi ekadashi but returns home after traveling 250 km the way at home in yamagarni village nipani)

निपाणीजवळ असलेल्या यमगर्णी गावात ज्ञानेश्वर कुंभार नावाचे भाविक राहतात. त्यांच्या श्वानाचे नाव महाराज असून तो वारीच्या दिंडीत हरवला होता. गावातून 6 जुलैला निघालेल्या पायी दिंडीत महाराज हा श्वान देखील सहभागी झाला. त्यांने वारकऱ्यांबरोबर 250 किलोमीटरचं अंतरही पूर्ण केलं. मात्र, पंढरपूर येथून परत येताना लाखोंच्या गर्दीत हा श्वान हरवला.

हेही वाचा : SC-ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सगळी गणितं बदलणार!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंढरपुरात आपल्या लाडक्या श्वानाला शोधण्यासाठी कुंभार कुटुंबीयांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना दोन दिवसांनी रिकाम्या हातांनीच घरी परतावे लागले. संपूर्ण कुटुंब महाराज न मिळाल्याने दु:खी होतं. दरम्यान, कुंभार कुटुंबीयांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केली. गेल्या आठवडाभर महाराजचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की, दोनच दिवसांपूर्वी महाराज श्वान गावी परतला. 

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रचंड मोठी घोषणा, व्हिडीओच केला शेअर!

ADVERTISEMENT

हरवलेला लाडका श्वान घरी परतल्यानं कुंभार कुटुंबीयांच्या आनंदाला थाराच नव्हता. गावकऱ्यांनी तर महाराजची गावातून जंगी मिरवणूक काढली. गावी परतलेल्या महाराजचे (श्वान) हार घालून पूजन केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रत्येकाच्या मनात साक्षात विठ्ठलानेच पाळीव श्वानाला मार्ग दाखवल्याची भावना आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबई-पुण्याला पाऊस पुन्हा झोडपणार, IMD चा नवा अलर्ट!

महाराजचे (श्वान) मालक ज्ञानेश्वर कुंभार म्हणाले की, 'गुरुपौर्णिमेला तो नरसिंग मंदिरात असल्याचे समजले, तेव्हा आम्ही पुन्हा शोध घेण्यासाठी गेलो. पण, तो तिथे दिसला नाही. पण, आमच्या गावातील काही लोकांना तो पुन्हा दिसल्यानंतर त्यांनी गाडीत टाकून त्याला गावात आणलं. गावात आणल्यानंतर त्याला मंदिरात ठेवले त्यानंतर आम्ही सगळेजण मंदिरात जाऊन त्याची पूजा करुन त्याला घरी घेऊन आलो. तब्बल 250 किमीचा प्रवास करुन तो घरी परतलाय... विठ्ठलानेच त्याला घराचा मार्ग दाखवला. आमचा महाराज दोनवेळा ज्योतिबालाही जाऊन आलाय, एकदा फैजलाबादला जाऊन आलाय, त्यामुळे त्याला सगळा रस्ता माहित आहे.'   

    follow whatsapp

    ADVERTISEMENT