Premanand Maharaj : 'फिगर मेन्टेन करणं सोडा, हिंदू महिलांनो तुम्ही 4 मुलं...', प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Mahamandaleshwar Swami Premanand Maharaj : उज्जैन येथील बडनगर रोडवरील मोहनपुरा येथील श्री बाबाधाम मंदिरात श्रीमद भागवत कथेदरम्यान प्रेमानंद महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना प्रेमानंद महाराजांनी ''हिंदु महिलांनी फिटनेस मेंटेन करणे सोडा आणि 4-4 मुलं जन्माला घाला'', असा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हिंदू महिला आपली फिगर मेंटेन करायच्या मागे लागल्या आहेत

इतर समाजातील महिलांना 8-8 मुले होतायत

हिंदू महिलांनो 4-4 मुलं जन्माला घाला
Mahamandaleshwar Swami Premanand Maharaj : ''हिंदू महिला आपली फिगर मेंटेन करायच्या मागे लागल्या आहेत, आणि इतर समाजातील लोकांना 8-8 मुले होतायत'', असं वादग्रस्त व्यक्तव्य महामंडलेश्वर प्रेमानंद महाराज यांनी केले आहे. त्यासोबत हिंदु महिलांनो 4-4 मुलं जन्माला घाला, असा सल्ला देखील प्रेमानंद महाराज (Swami Premanand Maharaj) यांनी महिलांना दिला आहे. प्रेमानंद महाराजांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (mahamandaleshwar swami premanand maharaja controversial statement on hindu women ujjain uttar pradesh news)
उज्जैन येथील बडनगर रोडवरील मोहनपुरा येथील श्री बाबाधाम मंदिरात श्रीमद भागवत कथेदरम्यान प्रेमानंद महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना प्रेमानंद महाराजांनी ''हिंदू महिलांनी फिटनेस मेंटेन करणे सोडा आणि 4-4 मुलं जन्माला घाला'', असा सल्ला दिला आहे.
''हिंदू समाजातील स्त्रिया 1 ते 2 अपत्ये होण्यास कचरतात, तर इतर समाजातील लोकं 8-8 मुले जन्माला घालत आहेत. त्यामुळे हिंदू महिलांनी आपली फिटनेस मेंटेन करण्यापेक्षा सनातन धर्म आणि देशासाठी काहीतरी केले पाहिजे. सनातन संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महिलांनी प्रत्येकी चार मुलांना जन्म देण्याची गरज आहे'',असे प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना शिंदे सरकारचं आणखी मोठं गिफ्ट, काय मिळणार मोफत?
विशेष म्हणजे जर तुम्ही 2 मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतला आहे आणि तरी 3 मुलं झाली तरी काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुमच्या तिसऱ्या अपत्याची काळजी घेऊ, असे देखील प्रेमानंद महाराज यांनी कथेदरम्यान म्हटले आहे.
प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, इंडोनेशियामध्ये तिकिट काढून रामलीला पाहिली जाते. अनेक ठिकाणी देवाचे नाव घेतले तर ते कापून फेकून दिले जाते. त्यामुळे या समस्येवर आतापासून जागृत होण्याची गरज आहे. त्यामुळे भागवत कथेतील ज्या गोष्टी तुमच्या कानाला प्रिय आहेत, त्या सांगायला मी आलो नाही, तर सनातन धर्माला पुढे नेणाऱ्या गोष्टी सांगत आहे. सध्या सनातनचा झेंडा फडकावून हा धर्म पुढे नेण्याची चर्चा सर्वजण करतात, पण मी सर्वांना सावधगिरी बाळगण्याची सूचना करतो.
उत्तर प्रदेशातील 17 जिल्हे आमच्या हातातून गेले आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती आहे, तेथील लोकही याच समस्येशी झुंजत आहेत. आसाममधील 5 लाख लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नाही. माझा सरळ अर्थ एवढाच आहे की 25 वर्षांपूर्वी ते लोक 2 कोटी होते, नंतर 9 कोटी झाले आणि आता 38 कोटी झाले आहेत.अजून वेळ आहे, सावध रहा नाहीतर भारताचाही इंडोनेशिया होईल आणि लवकरच तुमचीही अल्पसंख्याकांमध्ये गणना होईल, असे देखील प्रेमानंद महाराज यांनी म्हटले आहे.