Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण व दमट हवामान! विदर्भातील जिल्ह्यांना झोडपणार वादळी पाऊस
Maharashtra Weather Today : राज्यात गेल्या 15 दिवसात मराठवाडा, विदर्भासह कोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं चित्र पाहायला मिळाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात उसळणार उष्णतेची लाट?

कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या धारा?

जाणून घ्या आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : राज्यात गेल्या 15 दिवसात मराठवाडा, विदर्भासह कोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं चित्र पाहायला मिळाल. काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान, तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. तर काही भागात कोरड्या हवामानाची नोंद वर्तवण्यात आली. अशातच आज शुक्रवारी 18 एप्रिल 2025 ला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारचं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> प्रेयसीला भेटायला घरी गेला, घरच्यांनी मुलीच्या हाती दिलं ब्लेड अन् प्रियकराचं गुप्तांगच कापलं...
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार/संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २४°C च्या आसपास असेल.
दरम्यान, काल गुरुवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीडमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.