कामाची बातमी: फक्त 'या' 5 टिप्स फॉलो करा आणि काही मिनिटांतच चेक करा तुमचं PF बॅलेन्स

मुंबई तक

नोकरी करणाऱ्यांचं दर महिन्याला पीएफ (Provident Fund) कापलं जातं. त्यावेळी तुमच्या खात्यात किती पैसे जमा आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. आम्ही तुम्हाला तुमचं पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

PF बॅलेन्स चेक करण्यासाठी सोप्या टिप्स
PF बॅलेन्स चेक करण्यासाठी सोप्या टिप्स
social share
google news

बातम्या हायलाइट

point

PF बॅलेन्स कसं चेक करायचं?

point

पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

point

पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी कोणत्या साइटचा वापर करावा?

PF Balance Check: नोकरदार असलेल्या लोकांचं दर महिन्याला पीएफ (Provident Fund) कापलं जातं. पण आपल्या खात्यात किती पैसे असतात हे अनेकांना माहितीच नसतं. अशावेळी ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. रिटायरमेंटची तयारी असो किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती, पीएफ खात्यातून पैसे काढण्याची गरज भासतेच. अशात, तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलेन्सची माहिती असणं, अत्यंत आवश्यक आहे. EPFO मध्ये काही अशा सुविधा आहेत, ज्यांच्या साहाय्याने तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच घरबसल्या तुमच्या PF बॅलेन्सबद्दल माहिती मिळवू शकता. तुमच्या फोनवरुन तुम्ही ही प्रक्रिया सोप्या रितीने करु शकता. जाणून घेऊया, पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स.

पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी काय करायला हवं?

पीएफ बॅलेन्स चेक करण्यासाठी खालील डिटेल्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN): प्रत्येक कर्मचाऱ्याला EPFO द्वारे हा 12 अंकी नंबर दिला जातो. पीएफ अकाउंट्ससाठी हा नंबर अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. 
रजिस्टर्ड मोबाईल नंबर: तुमचा मोबाईल नंबर UAN म्हणजेच यूनिव्हर्सल अकाउंट नंबरशी लिंक असणं गरजेचं असतं.
KYC अपडेटेड: तुमचं आधारकार्ड, पॅन कार्ड नंबर आणि बँक खातं UAN सोबत लिंक असायला हवं.
इंटरनेट कनेक्शन: ऑनलाइन प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

'या' टिप्स फॉलो करुन PF बॅलेन्स जाणून घ्या

1. UMANG App

UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) App च्या साहाय्याने तुमचं पीएफ बॅलेन्स चेक करु शकता.

  • APP डाउनलोड करा: प्लेस्टोरमध्ये जाऊन UMANG App डाउनलोड करा.
  • रजिस्टर करा: त्यात तुमच्या आवश्यक त्या डिटेल्स भरुन मोबाईल नंबर OTP च्या साहाय्याने व्हेरिफाय करा.
  • EPFO सर्व्हिस निवडा: App मध्ये 'All Services' हा पर्याय निवडून EPFO पर्याय सिलेक्ट करा.
  • 'View Passbook' निवडा: EPFO सर्व्हिसवर जाऊन 'View Passbook' पर्यायावर क्लिक करा.
  • लॉगिन करा: त्यात तुमच्या UAN आणि पासवर्ड टाका. पासवर्ड लक्षात नसल्यास 'Forgot Password' पर्यायाचा वापर करु शकता. 
  • बॅलेन्स चेक करा: तुम्ही कार्यरत असलेली कंपनी निवडा. त्यानंतर पीएफ बॅलेन्स आणि ट्रांझेक्शन डिटेल्स असलेलं तुमचं पासबुक स्क्रीनवर दिसेल. 

2. मिस्ड कॉलवरुन चेक करा

मिस्ड कॉलवरुन तुम्ही तुमचं पीएफ बॅलेन्स चेक करु शकता. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 9966044425 नंबरवर मिस्ड कॉल द्या. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमच्या फोनवर एक मॅसेज येईल. ज्यात तुमच्या पीएफ बॅलेन्स आणि शेवटच्या ट्रांझेक्शनचे डिटेल्स असतील. 

हे ही वाचा: Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!

3. मॅसेजवरुन चेक करा

तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवून पीएफ बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899  वर SMS पाठवा. मॅसेजमध्ये 'EPFOHO UAN' लिहा आणि पाठवा. मॅसेज पाठवल्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला पीएफ बॅलन्स आणि शेवटच्या ट्रांझेक्शनची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

हे ही वाचा: होणारी पत्नी ब्यूटी पार्लरमध्ये गेली अन् नको ते करून बसली.. 'ती' गोष्ट समजली अन् नवरदेव भर मंडपात बेशुद्ध!

4. EPFO पोर्टलवरुन चेक करा

EPFO च्या आधिकारिक वेबसाइटवर जाऊन तुमचं पीएफ बॅलेन्स अगदी सोप्या पद्धतीने चेक करु शकता. 

  • ऑफिशियल साइटवर जा: EPFO च्या अधिकारिक पोर्टल (https://www.epfindia.gov.in) वर जा. 'For Employees' सेक्शन निवडा:   होमपेज वर 'Our Services' टॅब अंतर्गत 'For Employees' वर क्लिक करा. 
  • 'Member Passbook' वर क्लिक करा: 'Services' सेक्शनमध्ये 'Member Passbook' ऑप्शन निवडा.
  • लॉगिन करा: तुम्हाला नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड तिथे एंटर करा आणि 'Sign In' वर क्लिक करा.
  • OTP व्हेरिफिकेशन: तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी ओटीपी पाठवला जाईल. हे एंटर करा आणि 'Verify' वर क्लिक करा.
  • पासबुक पहा: लॉग इन केल्यानंतर, तुमचा मेंबर आयडी निवडा. जर तुमचे एकापेक्षा जास्त पीएफ खाती असतील तर सर्व दिसतील. ज्या खात्याचं बॅलेन्स तपासायचं आहे ते खातं निवडा आणि 'View Passbook' वर क्लिक करा.
  • बॅलेन्स तपासा: तुमच्या स्क्रीनवर पीएफ पासबुक दिसेल, यामध्ये कर्मचारी आणि नियोक्त्याचे योगदान, व्याज आणि एकूण बॅलेन्स दिसेल.

5. UMANG वेबसाइटवरुन चेक करु शकता

तुम्हाला UMANG App डाउनलोड करायचे नसल्यास तुम्ही UMANG वेबसाइट वापरू शकता.

  • अधिकृत वेबसाइटचा वापर: UMANG वेबसाइट (https://web.umang.gov.in) वर जा.
  • EPFO सर्व्हिस सर्च करा: 'EPFO' शोधा आणि 'View Passbook' पर्याय निवडा.  
  • लॉगिन: तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • बॅलेन्स चेक करा: तुमच्या पासबुकमध्ये पीएफ बॅलेन्स आणि ट्रांझेक्शनच्या डिटेल्स पाहा.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp