Maharashtra Weather: 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस! 48 तासांत मोठा बदल, पाहा हवामानाचा अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!

point

पावसाचा जोर वाढणार की ओसरणार?

point

मुंबईत उकाडा वाढणार?

Maharashtra Rain : राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. अशातच काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता हा पावसाचा जोर वाढणार की ओसरणार हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे. उर्वरित जिल्ह्यांत आज (07 ऑक्टोबर 2024) हवामानाचा अंदाज कसा असेल? जाणून घेऊया. (maharashtra weather forecast heavy rainfall alert in these districts mumbai pune today 07 october 2024 imd report)

ADVERTISEMENT

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

हेही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?

'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिरूर, मंचर, खेड या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात 28 अंश सेल्सिअस कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. तर, सातारा जिल्ह्यातील काही भागातही जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

हे वाचलं का?

पावसासाठी ही स्थिती पोषक असून कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार आज आज सिंधुदुर्ग, बीड, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi : नवरात्रीचा पाचव्या दिवशी 'या' राशींना होणार धनलाभ! कुणाला मिळणार पैसाच पैसा?

मुंबईत उकाडा वाढणार?

मुंबईत पुढील तीन - चार दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. वातावरणाच्या उष्णतामानात वाढ होत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT