Maharashtra Weather: महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पावसाचं सावट? पाहा IMD चा अंदाज
Maharashtra Rain Updates : राज्यात आज (12 ऑक्टोबर) सर्वत्र विजयादशमीचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण पूर्णपणे आनंदी आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पावसाचं सावट?
आज राज्यात पावसाचा मूड काय?
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट!
Maharashtra Rain Updates : राज्यात आज (12 ऑक्टोबर) सर्वत्र विजयादशमीचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण पूर्णपणे आनंदी आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज देखील विजयादशमीच्या दिवशी राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोकण, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात तुमच्या शहरात पावसाची स्थिती कशी असणार? जाणून घेऊया... (maharashtra weather forecast rainfall october heat IMD alert report on dussehra today 12 october 2024)
ADVERTISEMENT
आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पावसाचा मूड काय?
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे वाचलं का?
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट!
परतीचा पाऊस उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे वातावरण तयार झाले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
त्याचबरोबर पुढील 5 दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT
राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा सोसावा लागत आहे. हवामान विभागाने 16 ऑक्टोबरपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT