Maharashtra Weather: गणपती विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढणार? 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप

point

बाप्पाच्या विसर्जनानंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार

point

'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

Mumbai Weather Forecast Today : राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. अशातच आता गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. (maharashtra Weather Forecast today 18 September 2024 after Ganesh Visarjan IMD alert to these districts)

आज म्हणजेच 18 सप्टेंबर 2024 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार असल्याने हवामान विभागाने आज कोणत्याही जिल्ह्यांना पावसाचा कुठलाच अलर्ट जारी केलेला नाही. त्यानुसार, राज्यात आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहील.

हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांनी टेन्शन घेऊच नका! घरात येईल बक्कळ पैसा, पण...

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात हलका पाऊस/ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यतेसह आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१°C आणि २३°C च्या आसपास असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Viral Video : ओढणी हातात घेऊन रिल बनवत होती, पाय घसरला अन् दरीत पडली, घटनेचा थरार पाहा जसाच्या तसा

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. तर, नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT