Maharashtra Weather : ऐन दिवाळीत पावसाचा राडा? आज कुठे काय परिस्थिती?

मुंबई तक

Maharashtra Rain Alert : आज 31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी आहे. पण, दिवाळीच्या मोसमातही राज्यात पावसाचा जोर दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांवर अजूनही पावसाचं सावट आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

point

मुंबईत कसं असणार हवामान?

Maharashtra Rain Alert : आज 31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्दशी आहे. पण, दिवाळीच्या मोसमातही राज्यात पावसाचा जोर दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांवर अजूनही पावसाचं सावट आहे. हे पाहता ऐन दिवाळीत पाऊस कोण कोणत्या भागात हजेरी लावणार? याबाबत सविस्तर हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया. (maharashtra weather forecast update Today 31 october rain alert in diwali 2024 to these districts IMD report mumbai pune)

राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

यंदा मराठवाड्यात दिवाळीच्या सणालाही पावसाचे सावट आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा : ladki Bahin Yojana: महिलांनो! खरंच दिवाळी बोनसचे 5500 मिळणार होते? काय आहे नेमकं सत्य?

ऐन दिवाळीत ऊन, थंडी आणि पावसाचा जोर असल्याने विचित्र हवामान स्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. 

त्याचबरोबर ठाणे, नाशिक, नगर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

मुंबईत कसं असणार हवामान?

बऱ्याच ठिकाणी सकाळी धुकं पसरत असल्याची स्थिती आहे. मुंबई शहरात आज हवामान सामान्यतः निरभ्र राहील. आज किमान तापमान 27.95 अंश सेल्सियस नोंदवले जाईल. तर कमाल तापमान 29.35 अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे. मुंबईत आज पावसाती शक्यता नाही. तर उद्या म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 28.37 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 30.71 अंश सेल्सियस असेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp