Maharashtra Weather : दिवाळी संपली तरी थंडी नाहीच! राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम?
Maharashtra Weather Update : यंदाच्या दिवाळीत राज्यातील अनेक भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. आता दिवाळी संपली पण अजूनही थंडीची चाहुल काही जाणवत नाहीये.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आज 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!
राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचं संकट कायम?
फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलं!
IMD Maharashtra Weather 4th November 2024 : यंदाच्या दिवाळीत राज्यातील अनेक भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. आता दिवाळी संपली पण अजूनही थंडीची चाहुल काही जाणवत नाहीये. अशावेळी आजही (4 नोव्हेंबर 2024) काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. (maharashtra weather forecast update november 2024 Unseasonal rainfall alert to these districts IMD report Winter season)
ADVERTISEMENT
नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली पण थंडीची एन्ट्री काही झालेली नाही आहे. अजूनही ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत आहे. त्याचबरोबर राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचं संकट अजूनही कायम आहे.
हेही वाचा : Manoj Jarange Patil : 'एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना...'; कंठ दाटला, जरांगे सर्वांसमोर रडले!
आज 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!
Weather Update of Konkan, RatnaGiri and SindhuDurg :हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (4 नोव्हेंबर 2024) कोकणात पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल.
हे वाचलं का?
Middle Maharashtra and Marathwada Thunder strom today: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.(weather of Pune, rainfall in Nasik, Ahilyanagar today)
हेही वाचा : Kartik Aaryan: काय सांगता! कार्तिक आर्यनने सांगितलं गर्लफ्रेंडचं नाव, म्हणाला, "तिचं प्रेम..."
फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलं!
IMD Weather in Pune and Mumbai Today:ज्यभरात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वातावरण दूषित झाले. या प्रदूषित हवेमुळे मुंबई आणि पुण्यात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर होताना दिसतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT