Maharashtra Weather: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार! IMD चा 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Weather News Update : राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharashtra Weather news today 28 august 2024 IMD report of Mumbai pune and these districts) 

तुमच्या शहरात आज हवामानाचा अंदाज काय?

महाराष्ट्राला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं आहे, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : 70 वर्षांच्या वृद्ध महिलेची बलात्कार करुन हत्या, आरोपीने दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला अन्...

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम स्वरुपाचा म्हणजेच मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये कुठे ढगाळ तर कुठे ऊन अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे आज उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. ऑगस्ट संपत आला तरी देखील म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक भागातील धरणं अद्याप 50 टक्केही पूर्ण भरली नाहीत.

हेही वाचा : Stree 2 Movie : Stree 2 चित्रपटाचे 'ते' सीन्स पाहिलेत का? राजकुमार रावने थेट Instagram वरच...

उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

मुंबईसह उपनगरात आज मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला नाही. या भागांमध्ये आज पावसाच्या हलक्या सरी किंवा ऊन अशी स्थिती राहणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT