Maharashtra Weather: मुंबई-पुण्याला पाऊस पुन्हा झोडपणार, IMD चा नवा अलर्ट!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

1 ते 4 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

point

IMD चा अंदाज काय?

point

कोणत्या जिल्ह्यात पावसाची किती टक्के नोंद?

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसांचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे. पण आता हवामान विभागाकडून नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत याचा परिणाम जनजीवनावर झाला. अशा परिस्थितीत आज (01 ऑगस्ट 2024) पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे नागरीकांची चिंता वाढली आहे. (maharashtra weather news update 1 august 2024 monsoon imd gave alert to this districts)

ADVERTISEMENT

IMD चा अंदाज काय?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. तसेच सांगली, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. अशा परिस्थितीत आज पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील चार दिवस म्हणजेच 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस बरसेल. 

हेही वाचा : मैत्रिणीला मुलगा बनून पाठवली 'फ्रेण्ड रिक्वेस्ट, प्रेमात पडली तरुणी अन् नंतर घेतला गळफास

त्याचबरोबर हवामान विभागाने कोकणात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे आणि विदर्भातील चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Khalilur Rehman Qamar: महिलेने दिग्दर्शकाला रुममध्ये बोलावलं अन्... 'तो' अश्लील Video लीक

कोणत्या जिल्ह्यात पावसाची किती टक्के नोंद?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थिती, जुलै महिन्यात राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT