Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र कसं करायचं अपलोड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

majhi ladaki bahin yojana how to upload self certificate hamipatra in  narishakti app know about full details
अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय?

point

हमीपत्र कसं भरून अपलोड करायचं?

point

अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागणार आहे.

How to Upload Self Certificate :  राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला, मुलींनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान  माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojna) या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागणार आहे. हे हमीपत्रात (Self Certificate) नेमकं काय आहे? आणि हे हमीपत्र नेमकं कसं भरून अपलोड करायचं आहे? हे जाणून घेऊयात. (majhi ladaki bahin yojana how to upload self certificate hamipatra in  nari shakti app know about full details) 

ADVERTISEMENT

हमीपत्र म्हणजेच सेल्फ सर्टीफिकेट, या हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. सर्व अटी समजून घेऊनच त्यावर सही करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे? त्यासाठीचे हे हमीपत्र आहे.  

हे ही वाचा : Pipani Symbol Freeze : शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

हमीपत्र कसं भरायचं? 

  • माझ्या कुटुंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपयांपेक्षा अधिक नाही. 
  • माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. 
  • माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  • मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियम/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. 
  • मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार/ कंत्राची कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 
  • मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य विद्ममान किंवा माजी खासदार/ आमदार नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत.
  • माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत. 
  • माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. 

या हमीपत्रातील 10 मुद्दे वाचून तुम्हाला त्याच्यासमोर दिलेल्या बॉक्समध्ये बरोबरची खूण करायची आहे. तसेच त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Microsoft Cloud Outage: वाट लागली... Microsoft चे सर्व्हर ठप्प, बँका ते फ्लाइट सारंच विस्कळीत

खात्यात पैसै कधी जमा होणार?

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पहिला हफ्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे वा केशरी रेशन कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT