ह्रदयद्रावक! ‘खिशात 1000 रुपये आहेत, अंत्यसंस्कार करा’, चंद्रपूरमध्ये घरातच घेतला फास
सुधीर लोखंडे नावाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कंपनीचा डीजीएम आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
-विकास राजूरकर, चंद्रपूर
Chandrapur News : ‘माझ्या खिशात 1000 रुपये आहेत. अंत्यसंस्कार करा’, असं सांगत दोन मुलांच्या बापाने गळफास घेतला. ही ह्रदयद्रावक घठना घडलीये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सुधीर लोखंडे असे आहे. सुधीर लोखंडेंनी आत्महत्या करण्याचं कारण सुसाईड नोटमधून समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या बल्लारपूरमधील विद्यानगर वॉर्डात सुधीर लोखंडे हे कुटुंबासोबत राहायचे. सुधीर लोखंडे हे बल्लारपूर पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे. जवळपास नऊ महिन्यांपूर्वी त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले होते. यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाला होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> Sana khan : ‘…नदीत फेकला मृतदेह’, भाजप पदाधिकारी हत्या प्रकरणाची Inside Story
दरम्यानच्या काळात, सुधीर लोखंडेंच्या आईची तब्येत बिघडली. त्यामुळे आधीच आर्थिक समस्यांनी त्रस्त असलेल्या सुधीर लोखंडेंना मानसिक त्रास सुरू झाला. ते नैराश्यात गेले आणि घरातच आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत.
घरातच घेतला गळफास
सुधीर लोखंडेंनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी सुधीर लोखंडेंचा लटकलेला मृतदेह बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुधीर लोखंडेंचा मृतदेह खाली उतरवला आणि पंचनामा केला. सुधीर लोखंडेंच्या पॅन्टच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात जे लिहिले होते, ते वाचून कुटुंबीयांनी आक्रोश केला.
ADVERTISEMENT
माझ्या खिशात 1000 रुपये आहेत
सुधीर लोखंडेंच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पेपर मिलचे डीजीएम (एचआर) अजय दुरातकर आणि कंत्राटदार संजय दानव यांच्या छळामुळे आपण आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. या दोघांनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सुधीर लोखंडेंनी सुसाईड नोटमध्ये केली आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> Cyber Crime: तुम्हीही सतत पॉर्न पाहता?, एक Email अन् तुमचा खेळ खल्लास!
कायदेशीर प्रक्रियेनंतर पोलिसांनी सुधीरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी डीजीएम आणि पेपर मिलच्या कंत्राटदाराविरुद्ध कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कंपनी व प्रशासन उघडपणे बोलण्यास तयार नाही. सुधीर लोखंडेंनी या सुसाईड नोटमध्ये ‘माझ्या खिशात 1 हजार रुपये आहेत, त्यातून अंतिम संस्कार करा, असे म्हटलेलं आहे.
कंपनीवर उपस्थित होताहेत प्रश्न
सुधीर लोखंडेंचे मेहुणे जयदास भगत यांनी सांगितले की, सुधीर लोखंडे गेल्या 25 वर्षांपासून बल्लारपूर पेपर मिलमध्ये कंत्राटी मजूर म्हणून काम करत होते. सुधीर लोखंडेंना कंत्राटदाराने नऊ महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकले होते, तेव्हापासून ते तणावाखाली होते.
वाचा >> औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून भयंकर हत्याकांड! तरुणाला बेदम मारलं अन् जिवंत असतानाच फेकलं विहिरीत
अनेकवेळा डीजीएम आणि कंत्राटदाराची भेट घेतली, मात्र काम होऊ शकले नाही. मानसिक छळ करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी जयदास भगत यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
आरोपी फरार, कारवाई सुरू
बल्लारपूरचे एसएचओ उमेश पाटील यांनी सांगितले की, सुधीर लोखंडेंनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यानुसार डीजीएम आणि कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डीजीएम आणि कंत्राटदार पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
ADVERTISEMENT