Manoj Jarange : ''एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केले तर...'', जरांगेंचा महायुती सरकारला इशारा
Manoj Jarange News :आमच्या ओरीजनल नोंदी आहेत, त्या कसं काय म्हणता खोट्या आहेत. आमची नोंद असून, आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही कोणती नियत आहे. छगन भुजबळांच ऐकून जर तुम्हाला आमचं वाटोळ करायचं असेल तर आमचा नाईलाज आहे, असे जरांगेंनी ठणकावून सांगितले.
ADVERTISEMENT
Manoj Jarange on Mahayuti Government :छगन भुजबळांचं ऐकून जर आमचं वाटोळ करायचं असेल तर आमचाही नाईलाज आहे. आम्ही किती सहन करायचं. मराठ्यांना दिलेले एकही कुणबी प्रमाणपत्रे रद्द केले तर सरकारला भोगावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी महायुती सरकारला दिला. तसेच राज्यात जर दंगली झाल्या तर त्याला 100 टक्के छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जबाबदार असतील,असे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटले आहे. (manoj jarange warn mahayuti government on kunabi certificate criticize chhagan bhujbal maratha reservation)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या ओरीजनल नोंदी आहेत, त्या कसं काय म्हणता खोट्या आहेत. आमची नोंद असून, आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही कोणती नियत आहे. छगन भुजबळांच ऐकून जर तुम्हाला आमचं वाटोळ करायचं असेल तर आमचा नाईलाज आहे, असे जरांगेंनी ठणकावून सांगितले.
हे ही वाचा : ''औकातीत राहा बेट्या हो...'', भुजबळांची जरांगे पाटलांवर बोचरी टीका
छगन भुजबळ आता उघडे पडले आहेत. त्यांनीच लक्ष्मण हाकेंचं आंदोलन उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच वडीगोद्री येथील आंदोलन मॅनेज असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच आमच्या सुद्धा मागण्या पुर्ण होतायत. एकही कुणबी नोंदी रद्द होणार नाही, नाहीतर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार, असा देखील जरांगेंनी महायुती सरकारला दिला.
हे वाचलं का?
सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर येण्याची भाषा करतो. तु झोप घरात पांढऱ्या मिशा काढून, तू लोकांमध्ये भांडण लावं, मराठा आणि धनगरांमध्ये हा 100 टक्के दंगल घडवणार आहे, असा आरोप जरांगेंनी भुजबळांवर केला. तसेच तुझे वाघ जर रस्त्यावर आले आणि मराठ्यांना जर त्रास झाला मग सांगतो तुला, असेा थेट इशाराही जरांगेंनी भुजबळांना दिला.
हे ही वाचा : NCP: 'अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं अन्...',
आम्हाला आमचे आरक्षण मिळाले नाही तर यापुढे मंडल आयोग रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन करू. मराठ्यांचे आंदोलन यापुढे मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT