Manoj Jarange : 'तू चूक केली', भांबेरीतून जरांगेंनी फडणवीसांना काय दिला इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय दिला इशारा?
Devendra fadnavis has done mistake, manoj jarange warned
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांनी मुंबईचा दौरा थांबवला

point

देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका

point

संचारबंदीमुळे जरांगे यांनी बदलला निर्णय

Manoj Jarange Patil Latest News : (इसरार चिश्ती, भांबेरी)  'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचं आहे. मी सागर बंगल्यावर येतो. घे म्हणावं जीव माझा', असं म्हणत मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. माघारी फिरताना जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली. 

ADVERTISEMENT

भांबेरी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून... त्याचा (देवेंद्र फडणवीस) जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं. आपण आता अंतरवालीत जाऊ. तिथे एक निर्णय घेऊ."

हेही वाचा >> '...पाठीत खंजीर खुपसणे असा उद्देश नव्हता', अजित पवारांचं मोठं पत्र

"सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तर आपण घेऊच आणि आरक्षण कसं देत नाही, तेही बघू. मराठ्यांवर किती अन्याय केला जातो, याबद्दल सावध रहा. काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागते. हट्टवादी भूमिका घेऊन लोकांना अडचणीत आणायचे नाही", असे मनोज जरांगे म्हणाले. 

हे वाचलं का?

जरांगेंनी फडणवीसांना काय दिला इशारा?

"दम लागतो ना त्याला. स्वागत आहे म्हणे सागर बंगल्यावर, हे स्वागत आहे का? तो रात्री करणार होता हे. त्याच्यापेक्षा दहापट मी हुशार आहे. फक्त तू गृहमंत्री झालेला आहे", असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. 

पुढे ते म्हणाले की, "आम्ही ठरवलं आहे की, या सगळ्यांना अंतरवालीत घेतो. या सगळ्यांना समजून सांगतो. कायद्याचा सन्मान कसा करायचा हे आपणही समजून घेतलं पाहिजे. बैठक संचारबंदीत कशी घेता येईल. संचारबंदी उठेलच ना... त्याला महाराष्ट्रात राहायचं आहे, आपल्यालाही राहायचं आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'जरांगेंमागे शरद पवार, टोपेंचा हात, पोलिसांवर दगडफेकही...', पाटलांवर खळबळजनक आरोप

"तोही (देवेंद्र फडणवीस) कुठे जाणार नाही. पण, तू (देवेंद्र फडणवीस) चूक केली. तू मला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे. स्वागत करतो, तू ये म्हणून आणि दारं लावून घेतले. हे पोलीस बांधव तुझे नाहीयेत. यांना विनाकारण तू वेठीस धरून कायद्याची... हे सगळ्या जनतेचं आहेत. संचारबंदी उठव, बघ मुंबईला येतो की नाही? आणि ते लोक सोडून दे लवकर. ते आमचे धरलेले. तुला ही विनंती", असे म्हणत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT