Majhi Ladki Bahin Yojana Status Check: अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच काम करा अन्...

रोहित गोळे

Many women have still not received the money for the 'Majhi Ladki Bahin Yojana'. In such a situation, know from the status whether you will get the actual money or not.

ADVERTISEMENT

अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच काम करा अन्...
अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच काम करा अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचा पैसे मिळाले की नाही?

point

माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी तुमचं Status जाणून घ्या

point

Beneficiary Status मध्ये एका क्लिकवर मिळेल माहिती

Majhi Ladki Bahin Yojana Status Check: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता.

माझी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती (Status) तपासल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, CSAC केंद्रात लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल.
 

Mazi Ladki Bahin Yojana Status Overview

 

योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनौॉााा
योजमनेचा लाभ महिलांना दरमहा 1500 रुपये
कोणी केली सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवात 28 जून 2024
लाभार्थी  महाराषट्रातील महिला
वयाची अट 21वर्ष ते 64 वर्षावरील महिलांसाठी 
उद्देश 

महिलांना आर्थिक मदत पोहचवण

अर्जाची शेवटची तारीख सप्टेंबर 2024
मिळणारी रक्कम किती?  1500 प्रति 
निवडणूक प्रकिया ऑनलाइन/ऑफलाइन
मुख्य पोस्ट Ladki Bahin Yojana

 

अलीकडेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणुकीच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित पैसे महिलांना दिले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात आले नाही.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही (Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check) या योजनेची पेमेंट स्टेट्स तपासणं गरजेचं आहे, त्यानंतर बँकेत जा आणि तुमचा DBT पर्याय सक्रिय करा.

माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती कशी तपासायची? (Majhi Ladki Bahin Yojana Status Check) 

महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टे्टस  तपासण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटमेंट तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलद्वारे, महिला त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात आणि पेमेंटची स्थिती देखील तपासू शकतात.

  • सर्वप्रथम तुम्हाला testmmmlby.mahaitgov.in पोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर लॉगिनसाठी एक पेज उघडेल.
  • तेथे तुम्हाला Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर Beneficiary Status लाभार्थी स्टेटसचे पेज उघडेल.
  • येथे तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाद्वारे माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासता येईल.
  • तुमच्या मोबाईल नंबरच्या पर्यायावर क्लिक करा आणि कॅप्चा टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
  • यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो टाका आणि Get Data वर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती दिसेल.
  • या पृष्ठावर तुम्ही तुमची पेमेंट स्थिती आणि फॉर्मचं स्टेट्स तपासू शकता.

हे वाचलं का?

    follow whatsapp