Maratha Reservation : जरांगेंना आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत काय झाला ठराव?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation : all party meeting over. what happened in the meeting?
Maratha Reservation : all party meeting over. what happened in the meeting?
social share
google news

Maratha Reservation All Party Meeting : मराठा आरक्षणाचा मुद्दा, राज्यात घडत असलेल्या हिंसक घटना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीतून सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगेंनाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आलेला ठराव वाचा जसाच्या तसा

1) “मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत.”

हे ही वाचा >> Maratha Reservation : “मी त्याला फाडून खाईन”, आमदार गायकवाडांचं धक्कादायक विधान

2) “कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे.”

हे वाचलं का?

3) राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून, यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘या’ मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र

ADVERTISEMENT

4) “तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे”, असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत मंजूर करण्यात आला.

आरक्षण देण्यासंदर्भात कायदेशीर पेच

मराठा आरक्षण्यात देण्यात असलेल्या कायदेशीर पेचावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली. यावेळी या बैठकीला सॉलिसीटर जनरलही उपस्थित होते. त्यांनी कायदेशीर अडचणींबद्दल सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. त्यावरही राजकीय नेत्यांनी सूचना केल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT