Marathi Population in Mumbai: मुंबईत किती मराठी आणि किती गुजराती? ही आकडेवारी पाहून तुम्हीही...

मुंबई तक

Marathi And Gujrati People In Maharashtra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश "भैय्याजी" जोशी यांनी मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Marathi And Gujrati People In Mumbai
Marathi And Gujrati People In Mumbai
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश "भैय्याजी" जोशी मराठी माणसांबद्दल काय म्हणाले?

point

मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये मराठी आणि गुजराती लोकसंख्या किती?

point

जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Marathi And Gujrati People In Maharashtra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश "भैय्याजी" जोशी यांनी मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 'मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे असं नाही. मुंबईची एकच भाषा नाही, तर अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे' असं भैय्याजी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं असून सामजिक स्तरावरही जोशींना धारेवर धरलं आहे. दरम्यान, 2011 च्या जणगणनेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई संपूर्ण शहर, ठाणे आणि रायगड मध्ये मराठी आणि गुजराती समाजाच्या लोकसंख्येची नोंद करण्यात आलीय. या ठिकाणी मराठी आणि गुजराती लोक नेमके किती आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कोराने (Quora) दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 च्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुजराती माणसांची लोकसंख्या लक्षणीय आहे. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत 15-20 टक्के लोक हे गुजराती आहेत. म्हणजेच गुजराती लोकसंख्या ही जवळपास 20 ते 30 लाखांच्या आसपास आहे. मुंबईतील एकूण लोकसंख्या 2 कोटींच्या आसपास आहे.

हे ही वाचा >> Jaykumar Gore यांच्यावर आरोप करणारी महिला समोर, काय घडलं होतं सगळं सांगितलं, इशाराही दिला...

परंतु, गुजराती समाज मुंबईतील अर्थव्यवस्था आणि कल्चरचा महत्त्वाचा भाग बनल्याचं समोर आलंय. मुंबईत मोठ मोठ्या उद्योगंधद्यात, कारखानदारी आणि स्थानिक व्यापारात गुजराती समाजाचं महत्त्वाचं योगदान आहे. सरकारी यंत्रणेनुसार केलेल्या जणगणनेनुसार याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाऊ शकते. 

मुंबई उपनगरात गुजराती समाजाची लोकसंख्या 10 लाखांच्या पार

2011 च्या जणगणनेनुसार, मुंबई उपनगरात गुजराती समाजाची लोकसंख्या 10 लाख 78 हजार 189 इतकी नोंदवण्यात आली आहे. तर मराठी लोकसंख्या 32 लाख 95 हजार 533 एवढी आहे. मुंबई शहरात मुंबई उपनगरात गुजराती समाजाची लोकसंख्या 3 लाख 49 हजार 902 नोंदवण्यात आलीय. तर मराठी लोकसंख्या 11 लाख 9 हजार 395 एवढी नमूद करण्यात आलीय.

हे ही वाचा >> Jaykumar Gore : राऊतांनी गंभीर आरोप केले, ज्युनिअर किरीट सोमय्या म्हटलं... जयकुमार गोरेंचं प्रकरण काय?

संपूर्ण मुंबईत 14 लाख 28 हजार 91 इतक्या लोकसंख्येची नोंद करण्यात आलीय. तर मराठी लोकसंख्या 44 लाख 4 हजार 928 इतकी नमूद करण्यात आलीय. तसच ठाणे जिल्ह्यात गुजराती लोकसंख्या ही 5 लाख 14 हजार 59 इतकी आहे. तर मराठी लोकसंख्या 58 लाख 70 हजार 205 इतकी नोंदवण्यात आलीय. रायगडमध्ये गुजराती लोकसंख्या 23 हजार 698 आहे. तर मराठी लोकसंख्या 21 लाख 8 हजार 846 इतकी आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp