Mazi ladki bahin yojana : 'या' महिला ठरणार अपात्र, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Majhi Ladki Bahin Yojana Form : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत स्वत: याबाबत म्हणाले की, 'कोणतीही शंका बाळगू नका, योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.' (mazi ladki bahin yojana these women will be ineligible to apply form what is the last date to fill the form)

'माझी लाडकी बहीण योजना' महाराष्ट्रात राबविली जात असल्याने महिलांमध्ये चांगला उत्साह आहे. 3 जुलै रोजी सरकारने या योजनेतील काही अटींमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच प्रत्येक कुटुंबातील एकटी महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते.

हेही वाचा : Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाहांची मोठी घोषणा

'या' योजनेसाठी कोणत्या महिला ठरणार अपात्र?

  • नवीन बदलांनुसार, ज्या कुटुंबांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या कुटुंबातील महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. 

  • तसेच, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. 
  • अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
  • हेही वाचा : Supriya Sule : विधान परिषद निवडणुकीआधी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, पडद्यामागे काय घडतंय?

     

    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन करत सांगितले की, 'अर्ज करताना कोणीही घाई करू नये. सरकारच्या नवीन निर्णयांमुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे. आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही पुराव्याची गरज भासणार नाही.

    ADVERTISEMENT

    15 वर्षे जुने रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हे रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातील. अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

    ADVERTISEMENT

    हेही वाचा : Worli Accident : साडी अडकली तरी थांबला नाही; शिवसेना नेत्याचा मुलगा नंतर...

     

    या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे. 8 जुलैपासून प्रत्येक गावात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याद्वारे महिला अर्ज करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे. कोणत्याही मध्यस्थींच्या बोलण्याला बळी पडू नका. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील तरुण सदस्याद्वारे अर्ज करू शकता. फोटो काढून आणि इतर माहिती भरून ई-केवायसी करता येते. शासनातर्फे आयोजित शिबिरांमधूनही महिलांना मदत मिळेल. 

      follow whatsapp

      ADVERTISEMENT