Thane : मुस्लीम कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्गापासून जवळच समुद्रकिनारी सुरू असलेल्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर अशा पद्धतीने राज्यात सुरू असलेल्या धार्मिक अनाधिकृत बांधकामांबद्दल भूमिका मांडलेली आहे.
ADVERTISEMENT
Raj Thackeray MNS President : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्ग्याजवळ केल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. सांगली येथील अनधिकृत बांधकामाबद्दलही राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर हे बांधकाम प्रशासनाकडून तातडीने हटवण्यात आले. राज यांच्या भूमिकेचं मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. या कार्यकर्त्याने राज ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पाठिंबा दिला.
ADVERTISEMENT
राज यांनी माहीम दर्ग्याजवळील आणि सांगलीतील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा मांडला. ही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. मात्र, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मुस्लीम समाजातून नाराज होऊ शकतो, अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे मुंब्र्यातील एका कार्यकर्त्याने राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
राज ठाकरे यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक
माहीम आणि सांगलीतील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा मांडल्यानंतर आता मनसे नेते आणि पदाधिकारी ठिकठिकाणची अशा बांधकामांवर बोट ठेवत आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातील अशाच अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला असून, गजानन काळे यांनीही वाशी भागातील पाम बीच परिसरातील मजारीच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा – राज ठाकरे यांचं महत्त्व वाढलंय की, एकनाथ शिंदे यांच्याकडून वाढवलं जातंय? काय राजकारण शिजतंय?
मनसेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेचं पक्षातील मुस्लीम कार्यकर्त्याने स्वागत केले आहे. मुंब्र्यातील मनसेचे कार्यकर्ते इरफान सय्यद यांनी राज ठाकरेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत त्यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटलं आहे.
इरफान सय्यद यांचा राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा, म्हणाले…
“राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असून ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत.माहीम येथील मजार अनधिकृत होती, त्यामुळेच ती हटवली. त्याचप्रमाणे मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामा संबंधी तक्रार अविनाश जाधव यांनी केली असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे”, अशी भूमिका इरफान सय्यद यांनी मांडली. मुंब्र्यातील असंख्य मुस्लिम बांधवांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा – राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊत यांची खोचक टिपण्णी, ‘सदू आणि मधू भेटले…’
राज ठाकरेंनी इशारा देताच प्रशासनाची तातडीने कारवाई
माहीम येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका मजारीजवळ अनधिकृत बांधकामांचा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला होता. हे अनधिकृत बांधकाम हटवलं नाही, तर आम्ही त्या ठिकाणीच गणपतीचं मोठं मंदिर बांधू असा इशारा राज यांनी दिला होता. अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करायचं असेल, तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. एका महिन्यात बांधकाम हटवलं गेलं नाही, तर आम्ही मंदिर बांधू, अशा आशयाचं विधान राज ठाकरेंनी केले होतं. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम काढण्याचे आदेश काढले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT