Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! फॉर्म भरलाय पण पैसेच आले नाहीत? ही आहेत कारणं...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्ज मंजूर पण, पैसे जमा नाहीत... कारण काय?

point

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

point

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Mazi ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते पाचव्या (दिवाळीनिमित्त 5व्या महिन्याचे अॅडव्हान्स) हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात. पण, अनेक महिलांच्या खात्यात अजून एक रूपयाही जमा झालेला नाहीये. यामागील नेमकं कारण काय समजून घेऊया.

ADVERTISEMENT

अनेक महिलांच्या खात्यात अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीयेत. पण टेन्शन नको. यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जर काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. (mukhyamantri majhi ladki bahin yojna if your money not deposit yet what are the reasons read in detail)

हेही वाचा : Bigg Boss 18 : डंके की चोट पे...गुणरत्न सदावर्ते पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार?

अर्ज मंजूर पण, पैसे जमा नाहीत... कारण काय?

  • अनेक महिलांनी जुलै, ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूरही झाले. पण, पैसेच आले नाहीत.
  • लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • जर आधार्ड कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत. 
  • त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना आधी माय आधार लॉगइनवर जाऊन बँक सीडिंग स्टेटस तपासा.
  • तसेच, योजनेच्या लाभासाठी व्यक्तिगत बँक पासबुक असावे. जॉइंट अकाउंटमुळे अर्ज रद्द होऊ शकतो.

हेही वाचा : Lawrence Bishnoi Gang: धमकी, सुपारी आणि दहशत... बिश्नोईच्या नेटवर्कची Inside स्टोरी

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र?

  • 21 ते 60 वयोगटातील महिला
  • वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.
  • या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.
  • इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
  •  सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • मूळ निवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचे पासबूक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT