Mumbai Local Video : टीसीचा शर्ट फाडला, बुक्के मारले... मुंबई लोकलमध्ये तुफान राडा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai ac local fight video viral passenger beat ticket checker churchagate to virar train news
मुंबईच्या एसी लोकलमध्ये एका टीसीला तीन प्रवाशांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकलमध्ये जोरदार राडा

point

प्रवासी आणि टीसीत तुफान लढाई

point

लोकलमधील मारहाणीचा व्हिडिओ होताय व्हायरल

Mumbai AC Local Fight Video : मुंबई लोकल म्हटलं की भांडण आलीच दररोज कुणाचं ना कुणाचं एकमेंकांसोबत वाजत असतं. मुंबईकरांना हे काय नवीन नाही. मात्र आता मुंबईच्या एसी लोकलमध्ये एका टीसीला (Ticket Checker) तीन प्रवाशांनी (Passenger) बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे? नेमका प्रवाशांनी टीसीला का चोप दिला? हे जाणून घेऊयात. (mumbai ac local fight video viral passenger beat ticket checker churchagate to virar train news)  

ADVERTISEMENT

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकातून एक एसी लोकल विरारसाठी सुटली होती. या लोकलमधून एक फॅमिली प्रवास करत होती. या प्रवासा दरम्यान डब्यात एक टीसी चढला होता. जसबीर सिंग असे या टीसीचे नाव होते. ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीसीने प्रवाशांचे तिकीट चेक करायला सुरूवात केली होती.

टीसी जसबीर सिंग तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेनमध्ये 3 प्रवासी फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी प्रवाशांना दंड भरायला सांगितला. यावरून त्यांच्यात सूरूवातीला शाब्दीक राडा झाला. या राड्याचे नंतर हाणामारीत रुपांतर झाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : खात्यात 3000 जमाच झाले नाही, महिलांनो कुठे कराल तक्रार?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, टीसी दरवाज्याच्या शेजारी पोहोचताना दिसत आहे. यावेळी तीन प्रवाशी त्यांच्या अंगावर धावून जातात आणि त्यांना मारहाण करू लागलात.यामध्ये त्यांचे शर्ट देखील फाटल्याची माहिती आहे. खरं तर तिकीट चेक करताना प्रवाशांनी टीसीला आयडी दाखवण्यास सुरूवात केली होती. मात्र टीसीने आयडी दाखवला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात हा वाद झाल्याची माहिती आहे.

अनिकेत भोसले या प्रवासाने टीसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडीओत ऐकू येत आहे की तो आपण कुटुंबासह प्रवास करत असल्याचे सांगत आहे. तसंच आपण ओळखपत्र मागितले असता दाखवले नाही असा दावा करत होता. 

ADVERTISEMENT

या संपूर्ण घटनेनंतर आरपीएफचे काही अधिकारी लोकलमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर प्रवासी अनिकेत भोसले याला नालासोपारा स्थानकात लोकलमधून उतरविण्यात आले. या घटनेनंतर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर ते 3 तरूण वठणीवर आले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली. तसेच एफआयआर नोंदवला गेला तर त्याच्या नोकरीवर परिणाम होईल या हेतून जसबीर सिंग यांनीच मोठं मन दाखवत प्रवाशांवर गुन्हा न दाखल करत सक्त तकीद देऊन सोडले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation: 'मराठ्यांनी उभा देश चालवायचा, आरक्षणाचं कुठून काढलं?', संभाजी भिडेंचा यू-टर्न

    follow whatsapp

    ADVERTISEMENT