Mumbai Breaking News: मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी बोट समुद्रात उलटली! 13 जणांचा मृत्यू, अपघात कसा घडला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai-Elephanta Boat Incident Update
Mumbai-Elephanta Boat Incident Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे निघालेली बोट उलटली

point

बोटीत 30 पेक्षा जास्त प्रवासी

point

बोटीत प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू, तर 21 जणांना वाचवण्यात यश

Mumbai Boat Collapse Incident : मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेण्यांकडे निघालेली निलकमल बोट खोल समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडलीय. नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल बोटीला थेट धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. बोटीत एकूण 100 हून अधिक पर्यटक प्रवास करत होतो. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 101 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मृतांमध्ये तीन नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असून इतर 10 जण नीलकमल बोटीतील प्रवासी असल्याचं समजते. तर मृतांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलीय. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: "मला मंत्रिपदाची एवढी हाव असती, तर..."; छगन भुजबळ 'हे' काय बोलून गेले

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून प्रवाशांनी भरगच्च भरलेली बोट एलिफंटाला निघाली होती. बोट एलिफंटाच्या दिशेनं जात असताना भारतीय नौदलाची एक स्पीड बोट समुद्रात सुसाट फेऱ्या मारत होती. ही बोट समुद्रातून वेगाने जात असताना पुन्हा यु टर्न घेऊन मागच्या दिशेने आली. त्याचदरम्यान समुद्रात प्रवास करत असलेल्या या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली आणि हे भयानक दृष्य कॅमेरात कैद झाले. 

हे वाचलं का?

इथे पाहा व्हिडीओ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT