Mumbai Boat Accident: बोट अपघातातील 13 मृतांची ओळख पटली, यादी आली समोर
Nilkamal boat accident deaths name: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात झालेल्या अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नावांची यादी आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नीलकमल बोटीला झालेल्या अपघतात 13 जणांचा मृत्यू
मृतांच्या नावाची यादी आली समोर
115 जणांना वाचविण्यात आलं यश
मुंबई: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून नजीक समुद्रात बुधवारी (18 डिसेंबर) एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये नौदलाच्या (Navy) एका स्पीड बोटीने नीलकमल नावाच्या एक प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. ज्यामुळे प्रवासी बोट समुद्रात बुडाली. या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी बेपत्ता आहेत. आता प्रशासनाकडून 13 मृतांची ओळख पटवून त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांची नावं
- निधिश राकेश अहिरे - वय, 8 वर्ष (राहणार, नाशिक)
- राकेश नानाजी अहिरे - वय, 34 वर्ष (राहणार, नाशिक)
- हर्षदा राकेश अहिरे - वय, 31 वर्ष (राहणार, नाशिक)
- माही साईराम पावरा - वय, 3 वर्ष (राहणार, धुळे)
- शफीना अशरफ पठाण - वय, 34 वर्ष (राहणार, गोवा)
- प्रविण रामनाथ शर्मा - वय, 34 वर्ष (राहणार, आंध्रप्रदेश)
- मंगेश महादेव केळशीकर- वय, 33 वर्ष (राहणार, बदलापूर)
- मोहम्मद रेहमान कुरेशी - वय, 35 वर्ष (राहणार, बिहार)
- रमा रतीदेवी गुप्ता - वय, 50 वर्ष (राहणार, नालासोपार)
- महेंद्रसिंह विजयसिंह शेखावत - वय, 31 वर्ष (राहणार, नेव्हीनगर नेव्हल स्टेशन करंजा)
- प्रज्ञा विनोद कांबळे- वय, 39 वर्ष (राहणार, नवी मु्ंबई)
- टी दीपक (नौदल) - वय, 40 ते 45 वर्ष (राहणार, नौदल)
- दीपक निळकंठ वाकचौरै - वय, 50 वर्ष (राहणार, गोवंडी)
हे ही वाचा>> Gateway of India Boat Accident: 'स्पीड बोट चालक तर स्टंटच...', 'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 115 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, या संपूर्ण दुर्घटनेचा व्हीडिओही समोर आला असून त्यात नौदलाची एक बोट वेगाने नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीच्या दिशेने आली आणि तिला समोरून थेट धडक दिली.
प्रत्यक्षदर्शीने दिली अपघाताची माहिती
दरम्यान, या अपघाताचा नेमका व्हीडिओ हा राजस्थानच्या जालोर येथील रहिवासी श्रवण कुमारने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वत: श्रवण कुमार हा नीलकमल बोटीमध्ये होता. श्रवणने सांगितले की, 'नौदलाची स्पीड बोट स्टंट करत होती. म्हणून मी, मोबाइलमध्ये त्यांचा व्हीडिओ शूट करायला सुरूवात केली. पण काही क्षणातच बोट आमच्या फेरीला धडकली.'
श्रवण कुमारने शूट केलेला हाच व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा>> Gate Way of India Boat Accident: भर समुद्रात 13 जणांचा कसा गेला जीव? बोट अपघाताची Inside Story
बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर
या घटनेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात गुचर बेटाजवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने एक भीषण अशा प्रकारचा अपघात झाला आहे. साधारणपणे 3 वाजून 55 मिनिटांनी घटना घडली आहे. जी नीलकमल बोट होती यावरील 101 प्रवाशांचा सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. नौदलाचे व्हॉईस अॅडमिरल संजय जगजितसिंह यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार, सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. जे मृतक आहेत त्या मृतकांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दिली जाईल.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT