Mumbai Local Train Suicide: पिता-पुत्राने ट्रेनसमोर उडी मारली अन्.. हादरवून टाकणारा VIDEO

मुंबई तक

ADVERTISEMENT

पिता-पुत्राची लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या
पिता-पुत्राची लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राची आत्महत्या

point

आत्महत्येची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद

point

पिता-पुत्राच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

Mumbai Bhayandar Local Train Suicide CCTV Video: भाईंदर: मुंबईच्या भाईंदर रेल्वे स्थानकावर आज (9 जुलै) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामध्ये पिता-पुत्राने एकत्र लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 च्या समोरील ट्रॅकवर सकाळी 10.30 वाजेच्या सुमाराल हा संपूर्ण प्रकार घडला. (mumbai local train suicide father and son commit suicide by jumping in front of local train shocking video from bhayander railway station)

मिळालेल्या माहितीनुसार, विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर वडील आणि मुलाने उडी मारून आपले जीवन संपवले. मृत वडिलांचे हरीश मेहता (वय 60 वर्ष) आणि मुलाचे नाव जय मेहता (वय 30 वर्ष) आहे. ते दोघेही वसईचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

हे ही वाचा>> Belapur Train Accident : लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना

दरम्यान, पिता-पुत्राने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मेहता कुटुंबीय हे वसईतील वसंत नगरी येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हादरवून टाकणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद

वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मेहता पिता-पुत्र भाईंदर रेल्वे स्थानकावर आले. त्यानंतर ते प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून चालत चालत विरारच्या दिशेने गेले. जिथे प्लॅटफॉर्म संपला तिथून हे दोघेही पिता-पुत्र खाली उतरले आणि पुन्हा रेल्वे रुळावरून चालत गेले. काही अंतर चालल्यावर चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या एका लोकल ट्रेन खाली त्या दोघांनीही स्वत:ला झोकून दिला. ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही काळ स्थानकात एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या घटनेबाबत माहिती देताना रेल्वे पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी सांगितलं की, मेहता पिता-पुत्र यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. पण त्यांनी आत्महत्या का केली याचा आम्ही तपास करत आहोत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mihir Shah : पोलिसांना गुंगारा देणारा मिहीर शाह कुठे लपला होता?

बेलापूरमध्ये रेल्वे अपघातात महिलेने गमावले दोन्ही पाय

दुसरीकडे कालच (8 जुलै) सीबीडी बेलापूर येथे एका महिलेने रेल्वे अपघात आपले दोन्ही पाय गमावल्याची घटना समोर आली होती. प्लॅटफॉर्मवरुन अचानक महिलेचा पाय घसरला आणि ती थेट रेल्वेखाली सापडली होती. सुदैवाने या अपघातात महिलेचा जीव वाचला, मात्र तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले. कालच्या या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT