Mumbai Weather Update: पुढील २४ तासात मुंबई आणि महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai rain news in marathi imd issue  red alert issue for mumbai heavy to heavy rainfall bmc warn mumbaikar
मुंबईकरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत कसं असेल हवामान?

point

महाराष्ट्रातील पावसाचा नेमका अंदाज काय?

point

हवामान खात्याने वर्तवला पुढील तासातील हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update: मुंबई: महाराष्ट्रात यंदा मान्सून हा उशिराने सक्रीय झाला आहे. मात्र, आता अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील 24 तासात शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय कोकणात मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 10th july 2024)

महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert) 

मुंबईतील हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज वर्तवले आहेत. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे. 

मुंबई आणि उपनगर मध्यम स्वरूपाचा पाऊस

  • पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज असा की,  शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हे ही वाचा>> Raigad Fort: रायगडावर असं का घडलं?, ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल!

कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता 

  • कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता 

  • उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Rain Update : रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी, इतर जिल्ह्यांमध्ये हवामान काय?

दक्षिण मध्य महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

  • दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील 24 तासात मध्यम स्वरुपाचा पाऊस 

  • मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता 

  • विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज पाहासाठी View PDF इथे क्लिक करा

विशेष म्हणजे जुलैमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT