MHADA Lottery 2024: उरले फक्त काही तास! मुंबईतील घराचं स्वप्न होणार साकार; असा करा अर्ज
Mumbai MHADA : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने (MHADA) मुंबईतील घरांसाठी मोठी सोडत जाहीर केली आहे. या लॉटरीत मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम मालाड या ठिकाणांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
MHADA ने मुंबईतील घरांसाठी मोठी सोडत जाहीर केली
म्हाडाचे घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
Mumbai MHADA : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने (MHADA) मुंबईतील घरांसाठी मोठी सोडत जाहीर केली आहे. या लॉटरीत मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम मालाड या ठिकाणांचा समावेश आहे. ही लॉटरी अशा लोकांसाठी आहे ज्यांना मुंबईत त्यांचे स्वप्नातील घर घेण्याची इच्छा आहे. म्हाडाने विविध श्रेणी आणि बजेटमधील घरे देऊ केली आहेत, ज्याचा फायदा विविध उत्पन्न गटातील लोकांना होणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेऊयात. (Mumbai MHAD lottery 2024 for 2030 houses know how to apply online from 9 august 2024 to 4 september 2024)
ADVERTISEMENT
7 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने म्हाडा लॉटरी 2024 योजनेअंतर्गत 2,030 घरांची मोठी सोडत जाहीर केली. या गृहनिर्माण योजनेची अधिकृत जाहिरात 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आणि यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज ( 9 ऑगस्ट 2024) दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल. 4 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केला जाईल.
हेही वाचा : Neeraj Chopra: 'खेल अभी बाकी है!' भारताच्या खात्यात 'रौप्य'; भालाफेकीत नीरज चोप्राचा मोठा पराक्रम!
अर्ज कसा करायचा?
तुम्हीही मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल आणि लॉटरीत सहभागी होऊ इच्छित असाल, तर तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे वाचलं का?
- सर्वात आधी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट housing.mhada.gov.in वर जा. अर्जदाराचे नाव, पासवर्ड तयार करून स्वतःची नोंदणी करा.
- उपलब्ध पर्यायांमधून इच्छित लॉटरी आणि योजना निवडा.
- आवश्यक लॉटरी नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा. फीची रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या श्रेणीवर आधारित असेल.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सल चेक, अधिवास प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट फोटो, जन्म प्रमाणपत्र, अर्जदाराच्या संपर्काचे तपशील आवश्यक आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यातील काही भागांत पावसाची विश्रांती; पण 'या' जिल्ह्यांना 'मुसळधार' इशारा!
कधीपर्यंत करता येणार अर्ज?
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, 4 सप्टेंबर 2024 ते रात्री 11:59 पर्यंत ऑनलाइन ठेवी स्वीकारल्या जातील. प्राप्त झालेल्या लॉटरी अर्जाची प्रारूप यादी 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध केली जाईल.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana List 2024 PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?
अर्जदारांची श्रेणी
- अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये
- अल्प उत्पन्न गट (LIG) – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 9 लाख रुपये
- मध्यम उत्पन्न गट (MIG) – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 12 लाख रुपये
- उच्च उत्पन्न गट (HIG) – 12 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT