Bengaluru Viral Video : केस ओढले, कानाखाली खेचली… सेलमधील साड्यांसाठी भिडल्या महिला
सोशल मीडियावर सध्या कपड्यांच्या दुकानातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 2 महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
बंगळुरु : सोशल मीडियावर सध्या कपड्यांच्या दुकानातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 2 महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. हे भांडण एवढ्या जोरात सुरु आहे की, त्या रागात एकमेकींचे केस ओढत आहेत, कानाखाली मारत आहेत. अखेरीस हे भांडण सोडविण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागत आहे. आता तुम्हाला हा वाद कशासाठी सुरु आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर आहे ते सेलमध्ये मिळणाऱ्या साड्यांसाठी. (Women fight in Bangalore to buy sarees in sale, video goes viral)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बंगळुरुचा आहे. इथे म्हैसूर सिल्क साड्यांचा वर्षातून एकदा सेल निघतो. त्यामुळे महिला साडी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याचवेळी एका साडीवरुन 2 दोन महिला एकमेकांशी भिडल्या. दोघीही साडी सोडायला तयार नव्हते. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांना भांडताना पाहून आश्चर्यचकित झाले होते. भांडण हाणामारीवर येताच आजूबाजूचे लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात.
Mysore silk saree yearly sale @Malleshwaram .. two customers fighting over for a saree.👆🤦♀️RT pic.twitter.com/4io5fiYay0
— RVAIDYA2000 🕉️ (@rvaidya2000) April 23, 2023
हे वाचलं का?
दरम्यान, या व्हिडीओवर युजर्स मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 1.34 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 245 वेळा हा व्हिडीओ रिट्विट करण्यात आला असून शेकडो कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत. मल्लेश्वरममध्ये म्हैसूर सिल्क साड्यांचा वार्षिक सेल… एका साडीसाठी 2 ग्राहक आपापसात भांडत आहेत, असे व्हिडीओचे कॅप्शन आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने म्हटलं की, ‘मला ते लोक आवडतात जे जे काही घडत असले तरी ते मागे सोडून शॉपिंग करत आहेत.
कधी बिकिनी गर्ल तर कधी कपलचा किस… वैतागून मेट्रो प्रशासनाचं मजेशीर ट्विट
दुसऱ्या एका युजरने साडीची किंमत सांगत म्हटले की, भांडण, हाणामारी विसरून जा, डिस्काउंटनंतर साड्यांची स्टार्टिंग किंमत 15,000 ते 20,000 रुपये आहे’. यानंतरही प्रत्येकीने हातात किती साड्या पकडल्या आहेत, त्यावर एक नजर टाका. बंगळुरुचे लोक खूप श्रीमंत झाले आहेत. तर एका गाण्याचे बोल सांगत ‘साडी के फॉल से अॅटॅक किया रे… असे मिम्स शेअर करत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT