Solar Explosive Company Blast : …अन् झाला स्फोट! 9 कामगारांचा जागीच गेला जीव
Nagpur explosives factory blast : नागपूरपासून जवळच असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह या स्फोटक निमिर्ती कंपनीत मोठा स्फोट झाला. यात काही कामगारांचा मृत्यू झाला आहे. नेमकी घटना कशी घडली जाणून घ्या.
ADVERTISEMENT
Nagpur news marathi : नागपूरपासून जवळच असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (Solar Industries India Ltd) स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 9 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. सकाळी 9.30 वाजता हा भयावह स्फोट झाला. सध्या मदत व बचाव कार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (8-10 people died in blast at solar explosive company in nagpur)
ADVERTISEMENT
नागपूरपासून जवळ असलेल्या बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोसिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीचा कारखाना आहे. या ठिकाणी स्फोटकं तसेच दारूगोळा पॅक केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण स्फोट झाला. ज्यात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात महिला कामगारांची संख्या जास्त आहे.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना झटका; नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला काय सांगितलं?
सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत कसा झाला स्फोट?
कंपनीचे प्रमुख सत्यनारायण नुवाल यांनी घडलेल्या घटनेबद्दल मुंबई Tak ला माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. त्यांनी मृत झालेल्या कामगारांची 6 ते 7 असल्याचे सांगितले. काही लोक जखमी झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘चहा प्यायला रूपया नाही’, संसदेतील हल्ल्यानंतर अमोल शिंदेच्या कुटुंबियांची कशी आहे अवस्था?
नुवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोळसा खाणीत ब्लास्टिंगसाठी दारूगोळा पॅक करत असतानाच हा स्फोट झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीज की कंपनी संरक्षण मंत्रालयाला स्फोटकं तसेच इतर संरक्षण विषयक उपकरणांचा पुरवठा करते.
मृत्यू झालेल्या कामगारांची नावे
कंपनीत झालेल्या स्फोटातील मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख पटली आहे. त्यांची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
1) युवराज किशनजी चारोडे
2) ओमेश्वर किशलाल मच्छिर्के
3) मिता प्रमोद ऊईके
4) आरती निलकांता सहारे
5) स्वेताली दामोधर मारबते
6) पुष्पा श्रीरामजी मानपुरे
7) भाग्यश्री सुधाकर लोणारे
8) रुमिता विलास ऊईके
9) मौसम राजकुमार पटले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT