Nanded Accident Video : भरधाव स्कॉर्पिओने एकाला उडवलं, दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली, दोन जागीच ठार
नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यु झाला असून, सहा जण गंभीर ज़खमी आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भरधाव स्कॉर्पिओने पादचाऱ्याला उडवलं

स्कॉर्पिओ दुभाजकावरुन थेट दुसऱ्या बाजूला

नांदेडमधील अपघाताचा थरारक व्हिडीओ
Nanded Scorpio Accident CCTV Video : नांदेड नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी थरकाप उडवणारा अपघात झाला. भरधाव वेगात आलेली स्कार्पिओ गाडीनं एका पादचाऱ्याला उडवलं, त्यानंतर अनियंत्रित झालेली स्कार्पिओ गाडी थेट दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या संपूर्ण थरार एखाद्या चित्रपटातल्या सिनसारखा असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यु झाला असून, सहा जण गंभीर ज़खमी आहेत.
हे ही वाचा >> MLC Elections : भाजपचे विधान परिषदेचे तीन उमेदवार, एक फडणवीसांचे बालपणीचे मित्र, इतर दोन नेते कोण?
नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला. अर्धापूरहून नांदेडच्या दिशेनं स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने येत होती. या गाडीत आठ जण होते. बेफाम वेगात ही स्कॉर्पिओ पिंपळगाव पाटी जवळ आली. गाव आणि वर्दळ असूनही स्कॉर्पिओचा वेग काही कमी झाला नाही. एवढ्यातच रस्ता ओलांडून जात असलेल्या एका व्यक्तीला स्कॉर्पिओने उडवलं. यानंतर त्यानंतर अगदी काही क्षणात वाहन चालक बिथरला आणि त्याचं वाहनावरून नियंत्रण सुटलं. वेगात असलेली गाडी थेट दुभाजकावर चढली, दुसऱ्या बाजून गेली आणि नांदेडहून अर्धापूरकडे जाणाऱ्या ट्रकवर (समोरुन येणाऱ्या ट्रकला) जाऊन धडकली.
स्कॉर्पिओ एवढ्या वेगानं जाऊन ट्रकला धडकली की, गाडीत बसलेले आठही जण गाडीमध्ये दबले गेले होते. स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढलं. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्यांना तात्काळ उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या अपघाताता सय्यद हुजैफ (वय ३२) आणि शेख सलाम (वय ३०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघेही रहिवासी नांदेड शहरातील पाकीजा नगर येथील रहिवासी होते. तर शेख मस्तान शेख झैनुद्दीन (वय ३०, साई नगर, नांदेड), सय्यद एजाज सय्यद ग़ौस (वय २५), सय्यद फज़ल सय्यद ग़ौस (वय २७), नौमान खान हबीब खान (वय २०), शेख रिजवान शेख अलीम (वय २२), शंकर बोडके (पिंपळगाव, नांदेड) आदी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान अपघातग्रस्त लोक इफ्तारीसाठी नांदेडमध्ये आपल्या स्वगृही परतत होते. पण त्यांच्यावर वाटेतच काळाने घाला घातला.
हे ही वाचा >> शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता, त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रमजान महिन्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयावर आभाळ कोसळलं आहे. या मार्गावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहे.