Pune Accident : आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा जागी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला.
दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने बेफाम कार चालवत दुचाकी उडवली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दुचाकी उडवली

point

मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

point

एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Pune Accident News : बिल्डर पुत्राने बेफाम पोर्शे कार चालवत दोघांना उडवल्याच्या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच एका आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील कळंब येथे हा अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. (NCP MLA Dilip Mohite Patil's nephew hit two people, one died)

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडले. शनिवारी (२२ जून) रात्री पुणे-नाशिक महामार्गावर कळंब नजीक ही भीषण घटना घडली. ओम भालेराव (वय १९ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याविरोधात तक्रार

मंचर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी (22 जून) रात्री ९.२५ वाजता एकलहरे (ता. आंबेगाव, जि.पुणे) गावाच्या हद्दीतील नाशिक पुणे जुना महामार्ग रोडवर मयूर मोहिते पाटील याने कारने ओम भालेराव याच्या दुचाकीला धडकल दिली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना 'त्यासाठी' ब्लॅकमेलं केलं'' 

मयूर मोहिते झाला फरार

कारने दिलेली धडक इतकी भीषण होती की, दुचाकी दूर उडाली. या अपघातानंतर मयूर मोहिते पाटील याने मदत न करता कारमध्येच बसून होता. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आणि जमा झालेल्या लोकांना मंचर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 

हेही वाचा >> 'तुमचा मंत्री माझ्या मुलाचं करिअर संपवतोय, तुझं ते माझ्या बापाचं हे चाललंय भाजपचं'

मयूर मोहिते पाटलांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर मोहितेने मद्य प्राशन केले होते की नाही? याचा तपासही पोलीस करत आहे. दरम्यान, पुतण्याने मद्य प्राशन केलेले नव्हते, असे दिलीप मोहिते पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT