निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू! Nipah Virus किती धोकादायक? लक्षण आणि उपाय काय?
Nipah Virus in Kerala : कोरोना व्हायरसने हाहाकार माजवल्यानंतर मंकी पॉक्ससारख्या घातक विषाणूने शिरकाव केला. आता केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे रविवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
केरळमध्ये निपाह व्हायरसचा शिरकाव
प्राण्यांमुळे निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव
निपाह व्हायरस कसा परसतो?
Nipah Virus in Kerala : कोरोना व्हायरसने हाहाकार माजवल्यानंतर मंकी पॉक्ससारख्या घातक विषाणूने शिरकाव केला. आता केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे रविवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. निपाह व्हायरसच्या संक्रमणामुळे 24 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मलप्पुरमच्या एका नजीकच्या रुग्णालयात निपाह व्हायरसच्या संक्रमणामुळे एका युवकाचा मृत्यू झाला, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
ADVERTISEMENT
केरळमध्ये निपाह व्हायरसचा शिरकाव
केरळमध्ये निपाह व्हायरस हातपाय पसरत आहे. 2018,2021 आणि 2023 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात आणि 2019 मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यात निपाह व्हायरसने हाहाकार माजवला होता. कोझिकोड, वायनाड, इडुक्की, मलप्पुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात निपाह व्हायरस वटवाघूळ अँटीबॉडीचा शोध एका रिचर्सच्या माध्यमातून लागला होता. निपाह व्हायरसबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी उपसलं आमरण उपोषणाचं हत्यार!
प्राण्यांमुळे निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, निपाह व्हायरस एक जूनोटिक व्हायरस आहे. प्राण्यांच्या माध्यामातून हा व्हायरस माणसांमध्ये प्रवेश करतो. अनेकदा हा व्हायरस खाण्या पिण्याच्या माध्यमातून आणि एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. हा व्हायरस सर्वात आधी 1999 मध्ये मलेशियाचं गाव सुनगई निपाहमध्ये आढळला होता. याच कारणामुळे व्हायरसचं नाव निपाह ठेवलं होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा? तर काही व्यक्तींची लव्ह लाईफ...
निपाह व्हायरस कसा परसतो?
अनेक व्हायरसप्रमाणे निपाहचा सोर्सही प्राणी आहेत. वटवाघळांच्या माध्यमातून हा व्हायरस माणसांमध्ये पसरतो, असं म्हटलं जातं. डुक्कर, कुत्रा, मांजर, घोड्यांपासूनही हा व्हायरस पसरतो, असंही बोललं जातं. निपाह व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीला बाधा झाली, तर तो दुसऱ्या व्यक्तीलाही संक्रमीत करू शकतो. म्हणजे एकाच कारणामुळे दुसऱ्या लोकांनाही बाधा होऊ शकते.
ADVERTISEMENT