Petrol Pump Scam: सावधान! पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा; 'इथे' चुकलात तर बसेल मोठा फटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक कशी टाळावी? 

point

'ती' एक चूक अन् खिशाला फटका, कसं ते जाणून घ्या....

point

घनता इंधनाची शुद्धता दर्शवते

Petrol Pump Scam : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. याचदरम्यान अनेकदा पेट्रोल पंपावर फसवणुकीचे (Petrol Pump Scam) प्रकारही समोर येत असतात. जेव्हा तुम्ही पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला तुमच्या कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यास सांगता, तेव्हा तो तुम्हाला इंधन भरण्यापूर्वी मीटरमध्ये शून्य तपासण्यास सांगतो आणि तुम्ही या शून्यावर लक्ष ठेवता आणि नंतर 0.00 पाहून तुम्ही समाधानी होता. पेट्रोलपंप मालकांकडून फसवणूक केली जात नाहीये हे सुनिश्चित करण्यासाठी हा शून्य पाहण्यास सांगितलं जातं. अर्थात इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी हा शून्य पाहणं फार महत्त्वाचं असतं. (Petrol Pump Scam not only zero keep your eyes also on density meter while buying-petrol diesel)

अनेकदा आपलं लक्ष हे किती इंधन भरलं जात आहे याकडे आणि त्याची किंमत किती होते याकडे असतं. पण, सांगितलंय तेवढ्या किंमतीचच पेट्रोल भरलं असणार असं केवळ त्या शून्याच्या आधारे मानून ग्राहक पंपावरु निघून जातात. मात्र अशावेळी तुमची फसवणूकही होऊ शकते. कशी ते जाणून घेऊया.

पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक कशी टाळावी? 

पेट्रोल पंपावर होणारा हा खेळ खरं तर तुमच्या वाहनात टाकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या शुद्धतेशी संबंधित आहे. त्यात फेरफार करून तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्या लक्षात आले असेल की पेट्रोल पंपाच्या मशीन्सच्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये तुम्ही किती पेट्रोल भरले आणि किती प्रमाणात पेट्रोल भरले याची आकडेवारी पाहू शकता. या गोष्टींशिवाय, मशीनमध्ये आणखी एक स्क्रीन आहे, जी इंधनाची घनता (पेट्रोल-डिझेल घनता) दर्शवते आणि हे मीटर थेट तुमच्या वाहनात टाकलेल्या पेट्रोल किंवा डिझेलशी जोडलेले असते. अशा स्थितीत शून्यावर लक्ष ठेवण्यासोबतच इथेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Cheteshwar Pujara : ज्या संघासाठी जीव तोडून खेळला, त्यांनीच दाखवला बाहेरचा रस्ता

'ती' एक चूक अन् खिशाला फटका, कसं ते जाणून घ्या....


पेट्रोल पंपावरील होणाऱ्या या घोटाळ्याकडे पाहायचं झालं तर, या व्यवसायातील अनियमितता ग्राहकांच्या लक्षातच येत नाही. पेट्रोल भरणारा अटेंडंटसुद्धा तुम्हाला घनता (Density) दाखवणारा विभाग बघायला सांगणार नाही. पण जर तुम्ही या मीटरवर लक्ष ठेवलं तर तुम्ही तुमच्या खिशाला कात्री बसण्यापासून वाचू शकता. कारण या मीटरने पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळ शोधली जाऊ शकते.

घनता इंधनाची शुद्धता दर्शवते

नमूद केल्याप्रमाणे, पेट्रोल पंप मशीनमध्ये असलेले घनता (Density) मीटर फक्त तुमच्या इंधनाची शुद्धता दर्शवते. घनतेच्या माध्यमातून हे तपासता येते की तुमच्या कार किंवा बाईकमध्ये टाकले जाणारे पेट्रोल किंवा डिझेल पूर्णपणे शुद्ध आहे, म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या वाहनात भेसळयुक्त इंधन टाकले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशांचा अपव्यय तर होईलच पण तुमच्या वाहनाच्या इंजिनचेही नुकसान होईल. विशेष म्हणजे घनतेचा आकडा सरकार ठरवते.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Badlapur: 'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...', समोर आली नवी माहिती

 

पेट्रोलची घनता 730 ते 775 किलोग्रॅम प्रति घनमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. जर आपण डिझेलबद्दल बोललो तर त्याची घनता 820 ते 860 किलोग्रॅम प्रति घनमीटरवर निश्चित केली जाते. या श्रेणीतील इंधनाची घनता म्हणजे ते उच्च दर्जाचे आहे.

ADVERTISEMENT

अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक 

आता या घनतेच्या माध्यमातून पेट्रोल पंपांवर ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते याबद्दल जाणून घेऊया. सरकारने ठरवलेल्या मानकांशी छेडछाड करून फसवणूक केली जाते. घनता घनत्व दर्शवते. तुम्ही द्रवाच्या जाडीला त्याची घनता म्हणू शकता. ठराविक प्रमाणात घटक मिसळून पदार्थ तयार केला की त्या पदार्थाचा दर्जा ठरवला जातो, त्यात थोडाफार फरक केला तर त्यात भेसळ होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या अपडेटसोबतच दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलची घनता तपासल्यानंतर ते पेट्रोल पंपाद्वारे मीटरमध्ये अपडेट केले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इंधनाची फसवणूक टाळायची असेल, तर पेट्रोल आणि डिझेल भरताना केवळ शून्याकडेच नव्हे तर घनतेकडेही लक्ष द्या आणि त्यासाठी निश्चित केलेली मर्यादा लक्षात ठेवा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT