Pimpari Chinchwad Video : बाहुली घेऊन खेळत होती, अंगावर लोखंडी गेट पडला अन्...चिमुकलीसोबत काय घडलं?
Pimpari chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील बोपलेख परिसरातील गणेश नगरमधील वृंदावन बिल्डिंगमध्ये ही हदयद्रावक घटना घडली आहे. खरं तर या घटनेचा सीसीटीव्ही पाहिल्यास दोन मुले लोखंडी गेट जवळ खेळत असताना दिसतायत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गणेश नगरमधील वृंदावन बिल्डिंगमध्ये ही हदयद्रावक घटना घडली आहे.
गिरीजा शिंदेच्या अंगावर कोसळतो
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Pimpari Chinchwad News : पिंपरी चिंचवड, कृष्णा पांचाळ : पिंपरी चिंचवडमधून एक हदय पिळवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका चिमुरडीवर गेट कोसळून तिचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा शिंदे असे या साडे तीन वर्षाच्या चिमुरडीचे नाव आहे. चिमुरडीच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (pimpari chinchwad news girl died due to a gate falling on her shocking video news)
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवड शहरातील बोपलेख परिसरातील गणेश नगरमधील वृंदावन बिल्डिंगमध्ये ही हदयद्रावक घटना घडली आहे. खरं तर या घटनेचा सीसीटीव्ही पाहिल्यास दोन मुले लोखंडी गेट जवळ खेळत असताना दिसतायत. या दरम्यान दोन चिमुकल्या मुली बाहुली घेऊन गेटजवळ पोहोचतात. त्याचवेळेस एक चिमुरडा गेट ओढत तो बंद करण्याचा प्रयत्न करत असतो. स्लाईडिंग गेट असल्याने तो संपूर्ण बाहेर पडतो आणि बाजूलाच उभ्या असलेल्या गिरीजा शिंदे या चिमुरडीच्या अंगावर कोसळतो.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ही संपूर्ण घटना पाहून तिच्या आजूबाजूचे चिमुरडे आरडाओरड करतात. ा आरडाओरड एकूण स्थानिक नागरीक घटनास्थळी जमतात आणि चिमुकलीच्या अंगावरील गेट काढून तिला रुग्णालयात दाखल करतात. मात्र डॉक्टर चिमुरडीला मृत घोषित करतात. या घटनेने नागरीकांमध्ये रोष व्यक्त होतोय.
हे वाचलं का?
खरं तर चार मजली इमारत असलेल्या वृंदावन या बिल्डिंगचे गेट यापूर्वी दोन-तीन वेळा पडले होते. या संदर्भात नागरिकांनी व मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी अनेकदा बिल्डरकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र बिल्डरने या तक्रारी गांभीर्याने न घेतल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचा अर्ज थेट होणार रद्द? पटकन तपासा तुमचा अर्ज!
दरम्यान ज्या बिल्डींगमध्ये ही घटना घडली आहे, त्या बिल्डींगचा बिल्डर सिनो असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या इमारतीच्या लोखंडी गेटची वेळेवर देखभाल न केल्याने आज ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. तसेच या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत मुलीच्या कुटुंबीयांसह शेजारी राहणाऱ्या नागरिकांची आहे. दिघी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र पालकांची तक्रार येताच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT