Ïmpact feature: पंतप्रधान मोदी यांनी सिल्वासामध्ये नमो हॉस्पिटलचे उद्घाटन केले; भारताचे सर्वात पहिले AI पावर युक्त Knee रिप्लेसमेंट रोबोट हॉस्पिटल- Misso
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 450 बेड असलेले सिल्वासामधील नमो हॉस्पिटलचे उद्घाटन केले. AI पवर युक्त असलेले हे पहिलं Knee रिप्लेसमेंट हॉस्पिटल आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली, 11 मार्च 2025: आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 450 बेड असलेले सिल्वासामधील नमो हॉस्पिटलचे पहिल्या चरणाचे उद्घाटन केले. 460 कोटी मूल्य असलेली ही सुविधा या भागातील रुग्णांना अध्यायावत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ₹ 2500 कोटी रुपयांची जनकल्याणकारी प्रकल्पांचे उद्घाटन केले, यामध्ये नवीन रुग्णालय, शाळा आणि नागरी सुविधांसह तातडीच्या आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांचा आणि इन्फ्रास्ट्रक्चर चा समावेश होता.
त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित रुग्णालयाचे (3D) थ्री डी मॉडेलचा आढावा घेतला आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी टीमचे कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान Misso च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक शाह यांच्याकडून कडून सादर करण्यात आलेले भरतात बनलेले सर्वात पहिले एआय- पावर युक्त रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी यंत्रणा आकर्षणाचे केंद्र होते.
"Meril येथे काम करत असताना, आम्ही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत, हे असे तंत्रज्ञान आहे जे केवळ शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर त्याचे क्लिनिकल परिणाम हे रुग्णास जलद गतीने बरे होण्यास मदत करतात. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवास होतो आहे आणि त्यामध्ये Misso हा अभिमानास्पद टप्पा आहे," असे मेरिलचे सीईओ श्री विवेक शाह म्हणाले.
हे नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतातील सांध्याच्या शस्त्रक्रियांसाठी एक क्रांतिकारक पाऊल असेल, ज्यामध्ये अचूकता आणि रुग्ण जलद गतीने बरे होण्यास मदत मिळेल.
पंतप्रधानांनी भारताच्या आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये उत्सुकता व्यक्त केली. उच्च दर्जाची आरोग्य सेवा अधिक सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नमो हॉस्पिटलचे उद्घाटन हे भारताच्या वैद्यकीय यंत्रणेला बळकटीस देण्यासंदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्याच्या देशाच्या वचन पद्धतीला त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.