फलंदाजाने शॉट मारताच, गोलंदाजाने सोडला जागेवरच जीव! पुण्यातील घटनेचा व्हायरल Video

रोहिणी ठोंबरे

Pune News : पुण्यातील (Pune News) एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. क्रिकेट खेळता खेळता एका 11 वर्षांच्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोहगावमध्ये ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल

point

क्रिकेट खेळत असताना मुलाच्या प्रायव्हेट पार्टला जोरात बॉल लागल्याने जागीच मृत्यू

point

विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Pune News : पुण्यातील (Pune News) एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. क्रिकेट खेळता खेळता एका 11 वर्षांच्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोहगावमध्ये ही घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना मुलाच्या प्रायव्हेट पार्टला जोरात बॉल लागल्याने त्याचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. (Pune News a 11 Years old boy dies after ball strikes his private part)

अल्पवयीन मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शौर्य उर्फ ​​शंभू कालिदास खांडवे असे मृत मुलाचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुरुवारी (2 मे) ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य इतर मित्रांसोबत क्रिकेटचा सराव करत होता.

हेही वाचा: ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव

यावेळी शौर्य बॉलिंग करत होता. शौर्याने बॉल टाकताच फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या मुलाने एवढ्या जोरात शॉट मारला की शौरच्या प्रायव्हेट पार्टला हा बॉल लागला. यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. 

 

हेही वाचा:  बापरे! पगार 15 हजार, पण घरात सापडले 30 कोटी; Inside Story 

शौर्यला पडताना पाहून इतर खेळाडू आणि त्याचे मित्र त्याच्याकडे धावले. सुरुवातीला मित्रांना काही कळले नाही म्हणून त्यांनी इतर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बोलावून शौर्याला काय झालंय हे बघायला सांगितले.

हेही वाचा: तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द

शौर्याला उचलून दवाखान्यात नेईपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता दवाखान्यात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp