Pune Porsche Accident Updates : पुण्यात खळबळ! 'ससून'मधील मोठ्या डॉक्टरला अटक

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

pune accident news builder vishal agrawal son confession to police porsche car accident two killed
पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोर्श अपघात प्रकरण

point

ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

point

डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांनी केली अटक

Pune Porsche Accident Latest News in Marathi : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईने पुण्यात खळबळ उडाली असून, याचे धागेदौरे ससून रुग्णालयातील डॉक्टरपर्यंत पोहोचले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune police has arrested HOD of Forensic department ajay Taware)

ADVERTISEMENT

बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दुचाकी उडवली होती. १८ मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असून, आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपघात झाला त्यावेळी अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता का? हे त्याच्या रक्त चाचणीतून समोर येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच नवे वळण या प्रकरणाने घेतले आहे. 

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांनी काय केले?

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.

हे वाचलं का?

पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली की, ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुनेच बदलून टाकले.

हेही वाचा >> ''हिंमत असेल तर एक...'', भाजपाचं राऊतांना थेट आव्हान 

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहर हरलोर यांनी अल्पवयीन आरोपीने मद्य प्राशन केले होते, हे सिद्ध होऊ नये म्हणून त्याच रक्त गटाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या रक्त चाचणीसाठी दिले, असा आरोप आहे.

ADVERTISEMENT

आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे कसे आले समोर?

अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीला सकाळी  ११ वाजता ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याचे रक्त चाचणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले होते. 

ADVERTISEMENT

रक्त चाचणीच्या पहिल्या रिपोर्टमध्ये आरोपीने मद्य प्राशन केले नसल्याचे म्हटले गेले. तर दुसऱ्या रक्त चाचणीच्या रिपोर्टमध्ये आरोपीने मद्य प्राशन केलेले होते, असे म्हटले गेले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

हेही वाचा >> "मी सात वेळा...", निकालाआधी मोदींचं पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान 

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे रक्ताचे नमुने बदलल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आल्यानंतर डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली. 

अजय तावरेंची अधीक्षक पदावरून करण्यात आली होती हकालपट्टी

एप्रिल महिन्यातच डॉ. अजय तावरे यांची वैद्यकीय अधीक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. १ एप्रिल रोजी ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका ३० वर्षीय रुग्णाचा उंदीर चावल्याने मत्यू झाला होता. या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी डॉ. अजय तावरे यांना पदावरून हटवले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT