Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला भद्राचं सावट! राखी बांधण्यासाठी इतकेच तास शुभ
Raksha Bandhan Shubh Muhurat : हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण आज म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राखी बांधण्यासाठी शुभ-मुहूर्त कोणता?
'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी
रक्षाबंधन सणाचे महत्व
Raksha Bandhan Shubh Muhurat : हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याचवेळी, भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यातील प्रेमाचा सण आहे. रक्षाबंधन हा सण आज म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. (raksha bandhan 2024 date shubh muhurat know bhadra kal timings pujan vidhi and significance)
ADVERTISEMENT
रक्षाबंधनाची पौर्णिमा तिथी आज पहाटे 3:04 वाजता सुरू झाली आहे. ही तिथी दिवसभर चालेल म्हणजेच ही तिथी रात्री 11:55 वाजता संपेल. रक्षाबंधनाच्या पवित्र सणात भद्राला खूप महत्त्व दिले जाते कारण भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे या काळात राखी बांधू नये. चला तर मग राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेऊया.
हेही वाचा : Maharashtra Weather: कुठे उकाडा तर कुठे मुसळधार! आज तुमच्या शहरात पावसाचा अंदाज काय?
राखी बांधण्यासाठी शुभ-मुहूर्त कोणता?
रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. यापैकी कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता. पहिला शुभ मुहूर्त दुपारी 01:46 ते 04:19 पर्यंत असेल. म्हणजेच तुम्हाला राखी बांधण्यासाठी 2 तास 33 मिनिटे मिळतील.
हे वाचलं का?
दुसऱ्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचं झालं तर, प्रदोष काळात तुम्ही संध्याकाळी तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता. संध्याकाळी 06:56 ते 09:07 पर्यंत प्रदोष काळ असेल. या वेळेत राखी बांधणे देखील शुभ असणार आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! शिंदे सरकार महिलांना देणार आणखी एक गिफ्ट
'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी
भद्रा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुरू होणारा भद्रकाळ 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 29 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या काळात चुकूनही राखी बंधू नये.
ADVERTISEMENT
भद्रकाळात राखी बांधल्यास भावाला अडचणींचा सामना करावा लागतो असं म्हटलं जातं. आज दुपारी 1:29 वाजल्यापासून दिवसभरात कधीही राखी बंधू शकता. रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ काळ आहे. ॉ
ADVERTISEMENT
रक्षाबंधन पूजा विधी
रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी ताटात चंदन, अक्षता, दही, राखी, मिठाई आणि तुपाचा दिवा ठेवावा. प्रथम पूजेचे ताट देवाला अर्पण करावे. यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवावे. प्रथम भावाच्या कपाळावर टिळा लावावा. नंतर राखी बांधून ओवाळणी करावी. यानंतर त्याला मिठाई खाऊ घाला आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. राखी बांधल्यानंतर आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन बहिणीच्या चरणांना स्पर्श करून तिला भेटवस्तू द्या.
हेही वाचा : Satara Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला, रस्ते अपघातात झाला दुदैवी मृत्यू
रक्षाबंधन सणाचे महत्व
बहिणीच्या संरक्षणासाठी बांधलेला धागा म्हणजे राखी, याला रक्षासूत्र असंही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, राजसूय यज्ञादरम्यान, द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा भगवान श्रीकृष्णाला रक्षासूत्र म्हणून बांधला होता. यानंतर बहिणींनी भावांना राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली. तसेच पूर्वीच्या काळी ब्राह्मण आपल्या यजमानांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा देत असत. या दिवशी वेदपाठी ब्राह्मण यजुर्वेदाचे पठण सुरू करतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी शिक्षणाला सुरूवात करणे देखील शुभ मानले जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT