IPL मध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो! 'जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं...', व्हायरल Video मुळे 'हिटमॅन' निशाण्यावर

मुंबई तक

Rohit Sharma Viral Video :  मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपद जिंकलं आहे. परंतु, यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची पुरती दाणादाण उडाली आहे.

ADVERTISEMENT

Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यंदाच्या आयपीएल हंगामात रोहित शर्मा होतोय फ्लॉप

point

रोहित शर्माचा तो व्हिडीओ का होतोय व्हायरल

point

रोहित शर्माने जहीर खानसोबत काय चर्चा केली?

Rohit Sharma Viral Video : आयपीएल 2025 च्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपद जिंकलं आहे. परंतु, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची पुरती दाणादाण उडाली आहे. मुंबईचा संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत, प्रत्येक ठिकाणी संघाची कामगिरी खराब झालीय. सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यावर्षीच्या आयपीएलमध्ये धावांसाठी संघर्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहितच्या सुमार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा गुणतालिकेचा आलेख घसरला असून चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. 

अशातच रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं, आता करायची गरज नाही', हे विधान संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे मेन्टॉर जहीर खानसोबत रोहितने चर्चा केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा >> 8th April 2025 Gold Rate : बाईईई...काय हा प्रकार! दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, आजचे दर काय?

मुंबई इंडियन्सकडून शेअर केलेल्या या व्हिडीओत रोहितने म्हटलंय, जेव्हा करायचं होतं, तेव्हा बरोबर केलं. मला आता करायची गरज नाहीय. रोहितच्या या विधानामुळे इंटरनेटवर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणी हे रोहितच्या खराब कामगिरीशी जोडत आहे. तर कोणती त्याच्या भविष्याबाबत संकेत देत आहे.

इथे पाहा रोहित शर्माचा व्हायरल व्हिडीओ

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, रोहितने आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरोधात 0, गुजरात टायटन्सविरोधात 8, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 13 आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध अवघ्या 17 धावांची खेळी केली.

हे ही वाचा >> बीडसारखाच पॅटर्न संभाजीनगरमध्ये, बिल्डरला किडनॅप केलं, कपडे काढून मारलं, डोक्याला बंदूक लावून...

2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहितला कर्णधारपदावरून हटवलं आणि हार्दिक पंड्याच्या खांद्यावर कमान सोपवली. यामुळे रोहितच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 13 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा आहे की, रोहित या सामन्यात धावांचा पाऊस पाडून मुंबई इंडियन्सला विजयाच्या आशा पल्लवीत करेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp