Sai Baba Temple : शिर्डीत साई भक्तांची फसवणूक! बनावट देणगी पावती प्रकरण काय?
साईबाबा संस्थानच्या देणगी कक्षातून बनावट देणगी पावती देऊन एकाचवेळी भाविकांची आणि साईसंस्थानची फसवणूक झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता देणगी विभागातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ADVERTISEMENT
लाखो-करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई बाबा मंदिरातून (Sai Baba Temple) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साईबाबा संस्थानच्या देणगी कक्षातून बनावट देणगी पावती देऊन एकाचवेळी भाविकांची आणि साईसंस्थानची फसवणूक झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता देणगी विभागातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (sai baba temple fraud with donors sai sansthan disclose fake reciept one person arrested shirdi police)
ADVERTISEMENT
सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबा मंदिराला देश विदेशातील लाखाहून जास्त भाविक भेट देत असतात.आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक साईबाबांच्या झोळीत देणगीचे दान टाकत असतात. मात्र याच भाविकांची आता फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा : ‘हे वेळीच थांबवलं पाहिजे’, राज ठाकरेंनी गणेश मंडळांना झापले, सरकारला…
काही दिवसांपूर्वी साई मंदिर परिसरातील साईबाबा संस्थानच्या देणगी कक्षात एका भविकाची बनावट देणगी पावती देऊन फसवणूक झाल्याची तक्रार साईसंस्थानाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या शहानिशा केला असता या प्रकरणात तथ्य समोर आले होते. देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान आता साईबाबा संस्थानच्या लेखाधिकारी कैलास खराडे यांनी देणगी कक्षातील कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आता दशरथ चासकर विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गैरप्रकार उघड झाल्यानंतर आरोपी कर्मचारी दशरथ चासकर ( रा.सिन्नर ) फरार असून तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला लवकरच अटक करून या प्रकरणात अजून किती जणांचा सहभाग आहे हे आम्ही उघड करू अशी माहिती पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी दिली आहे.
हे ही वाचा : NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “काळजी करण्याची…”
तुर्तास शिर्डी संस्थानने दिलेल्या फिर्यादीत एका भाविकाची 12768 रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले आहे, मात्र आरोपीची चौकशी केल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आता या प्रकरणात आणखीण कुणाचा सहभाग आहे का? तसेच एकूण किती रूपयांची फसवणूक झाली आहे? या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT