MPSC Exam 2024: विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकलं, MPSC परीक्षेबाबत मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

 MPSC परीक्षेबाबत मोठा निर्णय
MPSC परीक्षेबाबत मोठा निर्णय
social share
google news

बातम्या हायलाइट

point

MPSC परीक्षेच्या तारखेबाबत आयोगाचा मोठा निर्णय

point

MPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलली

point

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर MPSC चा निर्णय

MPSC Exam Postponed: पुणे: पुण्यात मागील तीन दिवसांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होतं. MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याशिवाय कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करावा अशीही मागणी या विद्यार्थ्यांनी करण्यात येत होती. त्यासाठी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना आक्रमकपणे आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्या लागल्या होत्या. अखेर विद्यार्थ्यांचा रेटा लक्षात सरकारने MPSC परीक्षेच्या तारखेबाबत आता मोठा निर्णय घेतला आहे. (shinde govt bent before students big decision regarding mpsc exam commission informed that mpsc exam has been postponed)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी MPSC वर बराच दबाव होता. अखेर आज (22 ऑगस्ट) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एका तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीनंतर आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा>> Sharad Pawar: '...तर मी स्वत: आंदोलनाला उतरणार', शरद पवारांचा सरकारला थेट इशारा! नेमकं घडलं काय?

MPSC चा मोठा निर्णय, परीक्षा पुढे ढकलली!

आयोगाच्या बैठकीनंतर MPSC ने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून ट्वीट करून MPSC परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती दिली. 
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. असं ट्वीट करण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

MPSC ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ याबाबत ट्वीट केलं. 'काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.' असं फडणवीस म्हणाले.

परीक्षेची तारीख पुढे ढकलली तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम

दरम्यान, MPSC ने परीक्षेची तारीख पुढे ढकलली असली तरीही विद्यार्थी हे त्यांच्या आंदोलनावर अद्यापही ठाम आहेत. कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करावा याबाबत लेखी माहिती द्यावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन कायम ठेवलं असल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Pooja Khedkar : आयएएस खेडकरांमुळे 'एमपीएससी' उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात?

विद्यार्थ्यांनी का केलं आंदोलन?

MPSC राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि IBPS या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी (25 ऑगस्ट) रोजी ठेवण्यात आल्या आहेत. IBPS ही परीक्षा केंद्रीय स्तरावरील असल्याने त्यांनी या परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच MPSC ने परीक्षेची तारीख 25 ऑगस्टच असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे परीक्षांच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

ADVERTISEMENT

याव्यतिरिक्त 2021 आणि 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमधून कृषी विभागात निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. यासंदर्भातही परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT