आता IPhone, जिओ प्लस, एअरटेल विसरा! सॅटेलाईट फोनपेक्षा वेगळं आहे Starlink, थेट फोनमध्ये मिळणार सर्व्हिस?

मुंबई तक

Starlink India, Satellite Internet India : एलॉन मस्क यांची सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंक (Starlink) सध्या खूप चर्चेत आहे. जिओ आणि एअरटेलसोबत वेगवेगळा पण एकसारखा करार केल्यानं स्टारलिंकची चर्चा रंगलीय.

ADVERTISEMENT

Starlink Coming To India
Starlink Coming To India
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एअरटेलने स्पेस एक्ससोबत केला मोठा करार

point

AirFiber कशा पद्धतीनं काम करतं?

point

स्टारलिंक नेमकं आहे तरी काय?

Starlink India, Satellite Internet India : एलॉन मस्क यांची सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंक (Starlink) सध्या खूप चर्चेत आहे. जिओ आणि एअरटेलसोबत वेगवेगळा पण एकसारखा करार केल्यानं स्टारलिंकची चर्चा रंगलीय. एलॉन मस्क यांची एरोस्पेस कंपनी SpaceX लवकरच भारतात जिओ आणि एअरटेलच्या मदतीने सॅटेलाईट इंटरनेट सुर करेल. दरम्यान, अजूनही स्टारलिंकला भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. Airtel आणि Jio कडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्या स्टारलिंक इक्विपमेंटला त्यांच्या स्टोअरवर विकतील. ही सर्व्हिस कशा पद्धतीने काम करेल, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय.

जिओ आणि एअरटेलकडे AirFiber ची सर्व्हिस आहे, जे वायरलेस इंटरनेट सर्व्हिस ऑफर करत आहेत. परंतु, लोकांच्या मनात असाही प्रश्न निर्माण झाला आहे की, जेव्हा एयर फायबरची सर्व्हिस उपलब्ध होती, मग स्टारलिंकच्या येण्याने काय फायदा होईल? तसच Apple iphone वर सॅटेलाइट कम्युनिकेशनचा ऑप्शन मिळतो. या सर्व टेक्नोलॉजींमध्ये नेमका फरक काय आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

AirFiber कशा पद्धतीनं काम करतं?

एयरफायबर एक वायरलेस ब्राँडबँड सर्व्हिस आहे. यामध्ये तुम्हाला 5G नेटवर्क आणि एडवान्स wi-fi 6 टेक्नोलॉजीच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेट मिळतं. जरी ही सर्व्हिस वायरलेस असेल, तरीही यामध्ये टॉवरवर अवलंबून राहावं लागतं. तुमच्या घरी एक अँटीना लावला जातो. हे आसपासच्या टेलिकॉम टॉवरशी तुम्हाला कनेक्ट करतं.

हे ही वाचा >> '7.30 नंतरचं पाणी चालतं का?' राणेंचा राज ठाकरेंना टोला, गंगाजल वि. संध्याकाळचं पाणी... नेमकं प्रकरण काय?

ही सुविधा अशा परिसरात खूप फायदेशीर ठरते, जिथे ब्रॉडबँड केबलला पोहोचवलं जावू शकत नाही. यामध्ये तुम्हाला 100 ते 200 Mbps चा स्पीड लो लेटेंसीसोबत मिळतो. जिओ आणि एअरटेल दोन्हीही या पद्धतीची सर्व्हिस ऑफर करतात. 

स्टारलिंक नेमकं काय आहे?

स्टारलिंक भारतात मिळणाऱ्या एअरफायबरसारखं नाहीय. स्टारलिंक यापेक्षा खूप वेगळं आहे. एअरफायबर एखाद्या टॉवरशी कनेक्टेड असतात, त्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी लिमिटेडच असते. तर स्टारलिंक एक सॅटेलाईट बेस्ट इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर आहे, ज्याला SpaceX च्या सॅटेलाईटमुळे कनेक्टिव्हिटी मिळते. 

यामध्ये लो-अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर केला जातो. याच्या मदतीने यूजर्सला हायस्पीड इंटरनेट मिळतो. कारण ही सर्व्हिस सॅटेलाईटमुळे थेट मिळते. जिथे टॉवर आणि केबल लावण्यासाठी जागा नसेल, तिथेही हे उपलब्ध होऊ शकतं. आतापर्यंत जवळपास 7 हजारांहून जास्त स्टारलिंक सॅटेलाईट काम करत आहेत. याच्य मदतीमुळे यूजर्सला रिमोट एरियातही कनेक्टिव्हीटी मिळू शकते. 

हे ही वाचा >> 13 March 2025 Gold Rate : होळीच्या आधीच सोन्या-चांदीचे दर भिडले गगनाला? मुंबईसह 'या' शहरांत आजचे भाव काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp