एकनाथ शिंदेंच्या होर्डिंगवरून देवेंद्र फडणवीस गायब, ठाण्यात भाजप-सेनेत धुसफूस!
ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेत नाराजी आहे. दुसरीकडे विकासकामांच्या होर्डिंगवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोच लावण्यात आलेला नाही.
ADVERTISEMENT
Maharashtra Political News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. पण, सत्तेत आल्यापासून ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये आलबेल नसल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. याला निमित्त ठरले आहे, शिवसेनेकडून लावण्यात आलेले होर्डिंग!
ADVERTISEMENT
ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये धुसफुस असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दिवा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वागतासाठी शिवसेनेकडून डोंबिवलीत बॅनर/होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलेले नाही.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यात असलेल्या लोकार्पण कार्यक्रमाचे बॅनर डोंबिवली झळकलेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने हे बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. याबाबत शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितलं की, “हा कार्यक्रम ठाणे महापालिकेचा आहे. महापालिका त्यांचे बॅनर लावेल, मी जे बॅनर लावलेत ते शिवसेनेचे लावलेत.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> कोल्हापुरात हिंसेचा उद्रेक! शरद पवारांचं गंभीर विधान; शिंदे, फडणवीस काय म्हणाले?
“दिव्यात शिवसेनेची भाजपासोबत किती संख्या आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. विरोध करणारी भाजपा ही किती ही निमंत्रण दिले तरी येणार नाही. मग होर्डिंगवर तरी यांचे फोटो कशाला टाकायचे”, अशी टीका माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केली. मढवी यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
भाजपमध्ये नाराजी आणि धुसफूस
शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर कल्याण-ड़ोंबिवलीतील विकास कामे असो वा महापालिकेतील कामे अशा वेगवेगळ्या विषयांवरुन भाजपचे स्थानिक आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर जोरदार धुसफूस सुरू आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून श्रीकांत शिंदे प्रचंड सक्रिय झाले असल्याचे दिसत आहे. विकासकामांच्या बाबतीत मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रमोद पाटील यांच्यापेक्षा मीच कसा विकास पुरूष आहे, हे दाखविण्याचे प्रयत्न खासदार शिंदे यांच्याकडून होत असल्याची चर्चा दबक्या आवाज भाजपत सुरु आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> नारायण राणेंविरोधात ठाकरे-शिंदे गटाची एकजूट, कोर्टही म्हणालं, चला इथं तरी…
या बाबी भाजपबरोबरच मनसे कार्यकर्त्यांनाही खटकत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघात का लुडबुड करतात? त्यांनी विकास निधी आणून कामे केली असतील, तर जनहिताची कामे करताना त्यांनी त्याचा फार गवगवा करू नये, अशा भावना मंत्री रवींद्र चव्हाण समर्थकांमधून उमटू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT