Today Gold Rate: आता काय खरं नाय! नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबईसह 'या' शहरांमध्ये कडाडले सोन्याचे दर, कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

gold-silver prices today 31 august 2024 in maharashtra mumbai pune know the full details
आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आजचे सोन्याचे दर वाचून धडकीच भरेल

point

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

point

मुंबईसह इतर शहरांमधील सोने-चांदीच्या दराबाबत वाचा सविस्तर माहिती

Gold Rate Today In India : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या 24 आणि 22 कॅरेटच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, लखनऊ, जयपूर, मुंबई, कोलकातामध्ये मागणी वाढल्यानं सोन्याची सतत दरवाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव 94,900 रुपयांवर पोहोचला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोनं किती रुपयांनी महागलं आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

दिल्लीत आज सोन्याचं भाव 

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत जवळपास 77830 रुपये झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71360 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.

लखनऊ

लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 77830 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची रिटेल किंमत 71360 रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयपूर

जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 77730 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71360 रुपये झाली आहे.

हे ही वाचा >> Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खूर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

पटना 

पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची रिटेल किंमत 71260 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

ADVERTISEMENT

भुवनेश्वर

भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77680 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये इतकी आहे.

ADVERTISEMENT

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77680 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71210 रुपये आहे.

कोलकाता

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 77680 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची रिटेल किंमत 71210 रुपये इतकी आहे. 

हे ही वाचा >> मोठी बातमी : प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT