एका बॉटलवर दुसरी फ्री! भन्नाट ऑफर पाहून दारूच्या दुकानांबाहेर तुफान गर्दी, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

मुंबई तक

UP Liquor Discount: अनेकजण पिशव्या घेऊन आले, तर कुणी बॉक्समध्ये दारू घेऊन जात होते. ज्यांना स्वस्त दरात दारू मिळाली, त्यांचे चांगलेच चेहरे उजळले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एका बॉटलवर दुसरी फ्री, मद्यप्रेमींसाठी मोठी ऑफर

point

दारूच्या दुकानांबाहेर दिसणाऱ्या गर्दीचे व्हिडीओ व्हायरल

point

खरंच दारूच्या दुकानांमध्ये आहे का ऑफर?

दारूच्या दुकानांबाहेरचे काही व्हिडीओ काल सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या हापूरमधील दुकानाबाहेरचा आहे. मंगळवारी इथल्या दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी झाली होती. एका बॉटलवर एक बॉटल फ्री, या ऑफरमध्ये अनेकांची दिवाळी झाली.

खरंच बाय वन गेट वन ऑफर होती?

उत्पादन शुल्क विभागाचं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपणार आहे. त्यानुसार, कंत्राटदारांना 31 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत त्यांचा पूर्ण साठा संपवावा लागेल. तो जर संपला नाही, तर उर्वरित साठा सरकारी खात्यात जमा करावा लागेल. त्यामुळे कंत्राटदारांनी आपला साठा संपवण्यासाठी ही ऑफर देण्यात आली.

मंगळवारी या दुकानांवर एका बाटलीसह एक बाटली मोफत देण्यात आली. ही माहिती मिळताच दुकानाबाहेर चांगलीच गर्दी जमली. त्याचवेळी बाय वन गेट वन ऑफर पाहून मद्यप्रेमींचे चेहरे उजळले.

हे ही वाचा >> साताऱ्यातील दोघांचा थायलंडमध्ये तरूणीवर बीचवरच अत्याचार, पोलिसांकडून अटक, किती वर्षांची होऊ शकते शिक्षा?

हापूरमध्ये 140 देशी दारू, 104 कंपोजिट शॉप्स आणि 7 मॉडेल शॉप्स आहेत. 1 एप्रिलपासून नवीन परवाना सुरू होणार आहेत. त्यामुळे आता जुना साठा संपवला जातोय. मंगळवारी साकेत, धौलाना, स्वर्ग आश्रम रोडसह अनेक ठिकाणचा मद्य साठा संपवण्यासाठी एका बाटलीवर एक बाटली मोफत अशी ऑफर सुरू करण्यात आली.

जास्तीत जास्त दारू घेण्यासाठी धडपड

दारूवरच्या या ऑफरची माहिती मिळताच दारूच्या दुकानांवर गर्दी झाली होती. अनेकजण पिशव्या घेऊन आले, तर कुणी बॉक्समध्ये दारू घेऊन जात होते. ज्यांना स्वस्त दरात दारू मिळाली, त्यांचे चांगलेच चेहरे उजळले. ज्यांना दारू मिळाली नाही त्यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती.
 

मात्र, यादरम्यान दारूबाबत अशीही अफवा पसरली होती की, इतर अनेक दुकानांमध्येही दारूवर ही ऑफर आहे. त्यामुळे लोक तिकडेही जात होते. मात्र तिथे ही ऑफर नव्हती. 

हे ही वाचा >> Personal Finance: 1 एप्रिलपासून आनंदाची बातमी, नोकरदारांना होणार तब्बल 80,000 रुपयांचा फायदा

स्वर्ग आश्रम रोडवर असलेल्या किऑस्कवर सवलतीच्या दरात दारू खरेदी करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. जास्तीत जास्त दारू घेण्याचा प्रयत्न लोक करत होते. त्यामुळे काही वेळातच दुकानातील साठा संपला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp